मुंबई: दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येसाठी जातीय भेदभावाचे वातावरण कारणीभूत असल्याचे त्याच्या पालकांनी वारंवार सांगितले आहे. त्याबाबत पवई पोलीस ठाणे तसेच विशेष तपास पथक मुंबई यांनी जातीय भेदभावामुळे कंटाळून दर्शनने आत्महत्या केली. याची नोंद तपास करताना केलेली नाही, असा आरोप आज पुन्हा एकदा दर्शन सोलंकी याचे वडील आणि त्याची बहीण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेला आहे.
जातीभेदातून अमानवी वागणूक: दर्शन सोळंके याचा मृत्यू 12 फेब्रुवारी 2023 रोजी झाला; परंतु त्याच्या एक आठवड्या आधी सॅम राजपूत नावाच्या त्याच्या मित्रासोबत इंस्टाग्रामवर त्याने काही चॅट केल्याची माहिती आज दर्शनची बहीण जान्हवी सोलंकी हिने उघड केली. तिच्या सांगण्यानुसार सॅम राजपूत याला देखील दर्शन सोलंकी हा आरक्षित प्रवर्गातील आहे, असे माहिती पडल्यावर त्याने देखील त्याच्यासोबत संवाद बंद केला. त्याला वारंवार कॅन्टीनमध्ये आणि विद्यार्थी मित्र जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जमत तेव्हा जातीभेदावरून अमानवी वागणूक दिली जात. एवढेच काय तर त्याला टाळले जात. याच छळाला कंटाळून तो आत्महत्येपर्यंत पोहोचल्याचा आज त्याच्या बहिणीने पुन्हा एकदा पुनरुचार केलेला आहे.
वैयक्तिक वाद भासवण्याचा प्रयत्न? या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक चौकशी करीत आहे. त्यामध्ये त्यांना अरमान खत्री याचा उल्लेख दर्शनने आपल्या चिठ्ठीत केल्याचे म्हटले होते. दर्शनने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या आपल्या हस्ताक्षरातील चिठ्ठीमध्ये अरमान खत्री याने धमकावले होते, असा उल्लेख असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते; मात्र सत्र न्यायालयाच्या निकाल पत्रांमधून अरमान खत्री याला जामीन देताना त्यांनी स्पष्ट केले की, दर्शन सोलंकीच्या मृत्यूमागे अरमान खत्री कारणीभूत नाही. त्याने कोणतेही चिथावणी दिलेली नाही आणि त्याच्या चिथावणीमुळे दर्शन सोलंकी याने काही आत्महत्या केल्याचे सिद्ध होत नाही. सबब अरमान खत्री आणि दर्शन केवळ यांच्यातील हा वैयक्तिक वाद असल्याचे तपास यंत्रणा भासवत आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना केला.
हस्ताक्षर दर्शन सोलंकीचे नाही: दर्शन सोलंकी याचे वडील राजू सोळंकी आणि बहीण जण यांनी देखील आज हे स्पष्ट केले की, जेव्हा त्या चिठ्ठीबाबत पोलिसांनी आम्हाला विचारले तेव्हा आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले की, हे हस्ताक्षर दर्शन सोलंकीचे नाही. परंतु आम्ही वारंवार सांगूनही त्याबाबतीत दखल घेतली नाही. तसेच त्याचा मृत्यू जातीय भेदभावाच्या छळामुळे झाल्या असल्याची नोंद पवई पोलीस ठाणे आणि विशेष तपास पथक यांनी करावी म्हणून आम्ही प्रयत्न केला. मात्र त्या पद्धतीची नोंद त्यांनी अद्यापही केले नाही. यामुळेच ॲट्रॉसिटी कायदा 1989 अंतर्गत जी कलम या संदर्भात आयआयटी प्रशासनावर लावायला हवी ती लावली जात नाही. या कारणांमुळे हा लढा कमजोर होत आहे, असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
हेही वाचा:
Imran Khan Arrest: इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर! तत्काळ सोडून देण्याचे कोर्टाचे आदेश
Opposition Unity: नितीश कुमारांचे मिशन 2024! देशातील 'या' प्रमुख नेत्यांची घेतली भेट