मुंबई Dapoli Sai Resort Case : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात माजी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे तसेच सदानंद कदम यांच्यावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता होती. मात्र पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडेंनी 26 सप्टेंबर रोजी याप्रकरणी निकाल दिला जाईल, असे निर्देश दिल्याने दोन्ही आरोपींचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय.
तुरुंगातील मुक्काम वाढला : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई हॉटेल बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला गेला. तसंच यासंदर्भात पर्यावरण खात्याचे नियम देखील डावलण्यात आल्याची तक्रार 2022 साली दाखल झाली. यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने परब यांच्याशी संबंधित सदानंद कदम आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम विनायक देशपांडे यांना पोलीस कोठडी दिली होती. त्यासंदर्भात पीएमएलए न्यायालयात यासंदर्भात सुनावणी दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयानं आज निकाल न दिल्याने त्यांची सुटका लांबणीवर पडलीय. यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम मात्र वाढलाय. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयानं या दोन्ही आरोपींचा निकाल 18 जुलै रोजी निश्चित केला होता. मात्र पीएमलए न्यायालयात अनेक खटल्यांचा ढीग पडल्याने या निकालाचं वाचन करुन त्याच्यावर अंतिम हात फिरवणं हे काम अजून काही दिवस चालण्याची शक्यता आहे.
नेमक प्रकरण काय : अनिल परबांचे हस्तक म्हणून सदानंद कदमांनी साई हॉटेल बांधकाम प्रकरणी भूमिका निभावली होती. तसंच आर्थिक देवाणघेवाणही केली होती. त्यासंदर्भात ऑनलाईन आर्थिक व्यवहार झाल्याच्या ईडीने आरोप केलाय. सदानंद कदमांनी अनिल परब यांना मदत केली, तसंच माजी उपजिल्हाधिकारी जयराम विनायक देशपांडे यांनी देखील नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अनिल परब यांना मदत केल्याचे ईडीच्या वतीने सांगण्यात आलंय.
हेही वाचा :