मुंबई: मुंबईत कोरोना चाचण्या कमी केल्याने रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली आहे. (mumbai corona cases drop). आज ५५ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. (Mumbai Corona Update). गेल्या अडीच वर्षात १५० हुन अधिक वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही आता घट होऊन ५२९ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे ५५ नवे रुग्ण: मुंबईत ३१ ऑक्टोबरला २९०३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५५ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५३ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३३ हजार ७३२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०४४४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००७ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत चढउतार: मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च व एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, २२ सप्टेंबरला ९८, २३ सप्टेंबरला १०६, २४ सप्टेंबरला १२२, २५ सप्टेंबरला १०८, २६ सप्टेंबरला ५१, २७ सप्टेंबरला ८५, २८ सप्टेंबरला ११६, २९ सप्टेंबरला १००, ३० सप्टेंबरला ११५, १ ऑक्टोबरला १३०, २ ऑक्टोबरला १०२, ३ ऑक्टोबरला ६६, ४ ऑक्टोबरला १५५, ६ ऑक्टोबरला ८०, ७ ऑक्टोबरला १३२, ८ ऑक्टोबरला १३०, ९ ऑक्टोबरला १७२, १० ऑक्टोबरला १११, १२ ऑक्टोबरला १९४, १३ ऑक्टोबरला १७९, १४ ऑक्टोबरला १७८, १५ ऑक्टोबरला १८०, १६ ऑक्टोबरला १६७, १७ ऑक्टोबरला ९६, १८ ऑक्टोबरला १२८, १९ ऑक्टोबरला १४१, २० ऑक्टोबरला १४७, २१ ऑक्टोबरला १६१, २२ ऑक्टोबरला १४६, २३ ऑक्टोबरला ११८, २४ ऑक्टोबरला ५३, २५ ऑक्टोबरला ३२, २६ ऑक्टोबरला ८१, २७ ऑक्टोबरला ५९, २८ ऑक्टोबरला ८६, २९ ऑक्टोबरला १३२, ३० ऑक्टोबरला ८४, ३१ ऑक्टोबरला ५५ रुग्णांची नोंद झाली आहे.
१५४ वेळा शून्य मृत्यूची नोंद: मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १५४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात २४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.