मुंबई : ११ वी ऑनलाईन प्रवेशाची दैनिक प्रवेश अखेर सुरू झाले आहे. हे प्रवेश सतत होतील तसेच दैनिक गुणवत्ता पाहून हे प्रवेश केले जातील. प्रतीक्षा यादी मधील निवडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाची यादी रोज सकाळी दहा वाजता विभागीय कार्यालयाकडून घोषित करण्याची सूचना केली गेली होती. त्यानुसार आजच्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. केवळ २६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. अद्यापही ८१७५४ जागा रिक्त आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दक्ष राहून दररोज अर्ज भरायचे : अकरावी ऑनलाइन दैनिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात दक्ष राहून दररोज अर्ज भरावयाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत दैनिक गुणवत्ता फेरीत अर्ज करावा. तसेच सर्व कागदपत्रे नेमक्या रीतीने अपलोड करावेत म्हणजे अर्ज बाद होणार नाहीत. दैनिक प्रवेशामध्ये सकाळी सात वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुभा असे जेणेकरून विद्यार्थ्यांची प्रवेश होऊ शकतील. प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक विद्यालय तर जास्तीत जास्त दहा विद्यालय पसंती क्रमामध्ये निवडावेत. अशी सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी केलेली आहे.
प्रवेश केवळ अल्प का होतात : आज पर्यंत ११वी प्रवेशासाठी उपलब्ध जागा ८२,०२१ विद्यालय २६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. अर्ज नाकारलेले नाही अर्ज रद्द पण झाले नाही. मात्र रिक्त जागा ८१,७५४ ही संख्या मोठी आहे. कमी प्रवेश का होतात आणि जागा रिकाम्या का राहतात ह्या प्रश्नावर मुंबई विभागीय संचालक संदीप संगवे यांचे म्हणणे कि, विद्यार्थी विविध कोर्सेस ला प्रवेश घेतात. त्यामुळे इकडे जरी सुरवातील नोंद केलेली असली तरी इतर कोर्ससाठी विद्यार्थी वळतात. मात्र कोणत्या कोर्सला ते प्रवाश घेतात ते खात्री लायक समजू शकत नाही. तर शासनाच्या ह्या उत्तरावर प्रश्न निर्माण होतो कि विद्यार्थी ११ वी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करतात मात्र प्रवेश घेत नाही. त्यामुळे जागा रिक्त राहतात. संचालनालयाने याचा माग काढला पाहिजे कि विद्यार्थी नेमके जातात कुठे प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे असा जर सरकार दावा करते. तर इतर कोर्ससाठी प्रवेश घेतला त्याची सांख्यिकी नोंद सहज ठेवता येऊ शकते म्हणजे अर्ज केल्या पैकी किती ऑनलाईन प्रवेश घेतात. किती बाहेर प्रवेश घेतात तसेच किती ऑफ लाईन प्रवेश घेतात ते समजेल, अशी टिप्पणी अखिल भारत शिक्षा अधिकार मंच कार्यकर्ते अक्षय पाठक यांनी सांगितले.