ETV Bharat / state

Dahisar Police : बेस्टच्या चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक - बसची आणि व्हॅगनार कारची धडक

Dahisar Police: बेस्ट बसची तोडफोड करत सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करणाऱ्या 2 जणांना दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

dahisar police arrested
dahisar police arrested
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:48 PM IST

मुंबई: प्रवासी असलेल्या बेस्ट बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या आणि बेस्ट बसची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करणाऱ्या दोघा जणांना दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजीव गौरीशंकर सिंग (47 वर्ष), समीर दत्ताराम सुर्वे (45 वर्ष) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बसची आणि व्हॅगनार कारची धडक: काल रात्री फिर्यादी रमेश पवार हे त्यांच्या सहकारी असलेल्या कंडक्टर भारत मुंबईकर हे बेस्ट बस क्रमांक एम एच 01 एम एल 6432 ही बस दिंडोशी बस डेपो येथून काशी गावच्या दिशेने जात असताना रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी बस पायल जंक्शन दहिसर चेक नाका जवळ आली असताना व्हॅगनार कार क्रमांक एम एच 04, जीएम 99 37 ही बसला ड्रायव्हरच्या बाजूस येऊन धडकली.

दगडफेक करून नुकसान: त्यावेळी व्हॅगनार कारमधील तीन अज्ञात इसमाने कारमधून उतरून बसमध्ये चढून बस चालक रमेश पवार यांना हाताने लाथांनी मारहाण करून त्यांच्या हाताचा चावा घेऊन कपडे फाडले. आणि बसचे खाली उतरून दगडफेक करून नुकसान केले बसच्या काचा फोडल्या आरोपींनी केलेल्या दगडफेकी दरम्यान बसमधील महिला प्रवासाच्या हाताच्या बोटास जखम झाली.

जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार: हा प्रकार चालू असताना तेथे दहिसर पोलीस ठाण्याचे वाहन पोहोचले असता पळून जाणाऱ्या आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर फिर्यादी बस चालक रमेश पवार आणि इतर जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यानंतर फिर्यादी आणि दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि ताब्यात घेतलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.