ETV Bharat / state

Dahi Handi २०२३ : मुंबईत गोविंदा पथकांकडून थर लावण्यास सुरुवात; पावसाच्या हजेरीनं गोविंदांचा उत्साह शिगेला - Dahi Handi Festiva

Dahi Handi २०२३ : मुंबईत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन दहीहंडीच्या दिवशी मुंबईत पाऊस सुरू झाल्यानं गोविदांमध्ये उत्साह वाढला आहे.

Dahi Handi 2023
दहीहंडी 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 2:03 PM IST

माहिती देताना प्रतिनिधी

मुंबई : Dahi Handi २०२३ : मुंबईत आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमध्ये महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यातील गोविदांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला : 'सेलिब्रिटी दहीहंडी' अशी ओळख असलेल्या दादरमधील आयडियल बुक डेपो येथील दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुविधा येथील दहीहंडी, मनसेची दहीहंडी या दादर परिसरातील दहीहंडी आकर्षणाचा विषय असतात. आज सकाळपासूनच तिथे गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मागील महिनाभरापासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

अंध मुली आणि मुलांची दहीहंडी : दादर येथे नयन फाउंडेशन या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुलींची तीन थरांची तर मुलांची चार थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडीला सलामी दिली. आम्ही या संस्थेच्या अध्यक्षांशी संवाद साधला. ते म्हणाले. नयन फाउंडेशन संस्था अंध मुलांचा मनोरा रचणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आम्ही मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यावर्षी देखील आम्ही आमची परंपरा कायम राखत मुलं आणि मुलींचे थर लावले आहेत.

तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक : देशभरात दहीहंडी उत्सव हा आनंदात साजरा केला जातो. दहीहंडीचं प्रमुख आकर्षण असते ते गोविंदा पथक. महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (Dahi Handi) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. (First Transgender Govinda Pathak) यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक पुण्यात दहीहंडीत सहभाग घेतला आहे. हे राज्यातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक आहे.

हेही वाचा -

Dahi Handi 2023: राज्यातील पहिलं 'तृतीयपंथी गोविंदा पथक' पुण्यात; 50 पेक्षा अधिक तृतीयपंथी दहीहंडी फोडण्यास सज्ज

Dahi Handi २०२३ : आला रे आला गोविंदा आला! कोट्यवधींच्या बक्षिसांसोबतच राजकीय कलगीतुरा रंगणार

Janmashtami २०२३ : साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव; चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून किर्तन सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.