ETV Bharat / state

Goregaon Film City Development : गोरेगाव फिल्मसिटीचा होणार कायापालट, बांधण्यात येणार रेल्वेस्टेशनसह प्लॅटफॉर्म! - मुंबई फिल्म सिटी

आपण जर चित्रपटांचे शौकीन असाल तर तुम्ही मुंबईतील गोरेगावस्तीतील चित्रपटनगरी म्हणजेच फिल्मसिटीविषयी ऐकलेच असेल. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपटनगरी ही 521 एकरमध्ये वसलेली आहे. या चित्रपटनगरीमध्ये दररोज विविध भाषांतील चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजचे चित्रीकरण केले जाते. ही चित्रनगरी 1977 मध्ये स्थापन झाली आहे. आता ही चित्रपटनगरी कात टाकून नव्या रुपात अवतरणार आहे. या बदलेल्या फिल्मसिटीमध्ये चित्रपटकर्मींसाठी कोणती नवीन विशेषता असणार आहे हे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांच्याकडून जाणून घेऊ.

दादासाहेब फाळके चित्रपट नगरी
दादासाहेब फाळके चित्रपट नगरी
author img

By

Published : Jun 11, 2023, 8:21 AM IST

Updated : Jun 11, 2023, 10:50 AM IST

गोरेगाव फिल्मसिटीचा होणार कायापालट

मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरी देशभरात प्रसिद्ध आहे. या चित्रपट नगरीला बॉलीवूडचे घर देखील संबोधले जाते. ही चित्रनगरी 521 एकरमध्ये ही चित्रपटनगरी पसरलेली आहे. या परिसरात 16 मोठे स्टुडिओ आहेत तर 200 पेक्षा अधिक इनडोअर स्टुडिओ आहेत. येथे एका वेळेत 1 हजार चित्रपटाचे चित्रीकरण होऊ शकते. असा हा भव्यदिव्य, हॅपनिंग परिसराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येथे आल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीचे कलाकार, आवडीच्या एखाद्या मालिकेचे चित्रीकरण सहज पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात या नगरीचे रुप पालटणार आहे.

लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार : दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून फिल्मसिटीमध्ये सेटवर, स्टुडिओमध्ये आधुनिक सुधारणा करण्यात येणार आहेत. सोबतच रस्ते, वीज आणि सेटवर मुबलक पाणी पुरवठा याकडेही लक्ष दिले जाणार आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला लागूनच आहे, त्यामुळे तेथे वन्य प्राणीजीवांचा वावर असतो. त्यासह काही दुर्मिळ वृक्ष संपदादेखील तेथील परिसरामध्ये आहे. इतकेच नव्हे तर फिल्मसिटी परिसरामध्ये रेल्वे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म बांधण्याचा विचार निर्णयाधीन आहे. येत्या काही दिवसांमध्ये या नवीन संकल्पनेसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

21 दिवसाची कार्यशाळा : सोबत चित्रीकरणाद्वारे मिळणारा महसूल कशाप्रकारे वाढवण्यात येईल, यावर मीडिया आणि एन्टरटेन्मेंट रिपोर्टदेखील तयार करण्यात येणार आहे. 21 दिवसीय कार्यशाळेचे आयोजनासाठी मराठी चित्रपटांना राज्यशासन अनुदान देत असते. देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतात. या महोत्सवासाठी पात्र होणाऱ्या चित्रपटांच्या संदर्भात अनेकांना माहिती देणे, शासनाच्या विविध योजना, अनुदान, चित्रीकरणासाठी योग्य स्टुडिओची निवड कशी करावी, यासाठी फिल्मसिटीद्वारे 21 कार्यशाळेचे आयोजन केले जाते. दरम्यान अशीच एक कार्यशाळा जुलै महिन्यात होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, कोणते निकष लावले जातात याची माहिती देखील या कार्यशाळेमधून दिली जाते.

वन्य प्राण्यांचा वावर : दरम्यान या चित्रनगरीच्या शेजारी राष्ट्रीय उद्यान आहे. यामुळे चित्रनगरीत पर्यावरणाचे, पशुपक्षी, प्राण्यांची काळजी घेतली जाते. चित्रपटनगरीला लागूनच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने प्राण्याचा वावर देखील असतो. मात्र त्यांचा कधीही कोणाला त्रास झालेला नाही. फिल्मसिटी संस्थादेखील त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेत असते. काही अडचण निर्माण झालीच तर वनविभागाचे कर्मचारी तत्परतेने मदत करतात.

मालकी फक्त शासनाची : येथील जागा कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर कोणालाही दिली जात नाही. नियामाद्वारे ठराविक कालावधीसाठी चित्रीकरण करण्यासाठी या जागा उपलब्ध करून दिल्या जातात. फिल्मसिटी चित्रीकरणासाठी कोणाला परवानगी हवी असेल तर संगणीकृत प्रणालीचा वापर केला जातो. आवश्यकतेनुसार सेटची निवड करून ऑनलाईन पद्धतीने त्याचे बुकिंग केली जाते. शूटिंग संदर्भात विविध विभागाच्या ज्या काही परवानग्या लागतात. त्यासाठी एक खिडकी (वन विंडो) योजना फिल्मसिटीमध्ये उपलब्ध आहे.

कधी होणार आधुनिकीकरण : 2019 पासून आधुनिकीकरणाची प्रक्रिया याबद्दल माहिती, आराखडे दाखवले जात आहेत. मुंबईमधील मढ, मीरा रोड, नायगाव, ठाणे यानंतर नोएडा, रामोजी फिलमसिटी, उत्तर प्रदेश फिल्मसिटी ही आव्हाने या दादासाहेब फाळके चित्रनगरीसमोर आहेत. यामुळे ही चित्रनगरी आधुनिक आणि अजून भव्यदिव्य होण्याची गरज आहे. यासाठी तत्परतेने पाऊले उचलण्याची गरज आहे. तो सोनियाचा दिवस लवकर, यावा यासाठी चित्रपटप्रेमी प्रार्थना करत आहेत.

Last Updated : Jun 11, 2023, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.