ETV Bharat / state

राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा पूर्ण करा - दादाजी भुसे - dada bhuse news mumbai

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. येत्या १५ दिवसांमध्ये युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा पूर्ण करा,असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

dada bhuse instructed to administartion to  complete buffer stock of urea
राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करा - दादाजी भुसे
author img

By

Published : May 12, 2021, 10:07 PM IST

मुंबई - खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रिक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी युरियाची मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये तो पूर्ण करावा, एकत्रितपणे काम करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. या वेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात बफर स्टॉक

कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रिक टन युरियाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

खताच्या पुवठ्यावर दोन महिने लक्ष ठेवण्याचे निर्देश

कंपन्यांनी खत पुवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे. त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने लक्ष ठेवून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. यावर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रिक टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रिक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरिया ५ लाख ३० हजार मेट्रिक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रिक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रिक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.