मुंबई: मुंबईचे डब्बेवाले आणि इंग्लंडच्या राज घराण्याचे जुने संबंध आहेत. राणी एलिझाबेथ दुसरीचे निधन झाले तेव्हा मुंबईच्या डब्बेवाल्यांनी शोक व्यक्त केला होता. आज राणीच्या पार्थिवावर अंत्य संस्कार होत असताना डबेवाला असोशीएशन ने संदेश देत राणीच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे. एखादी व्यक्ती आपल्या तुन निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. तात्कालीन प्रिन्स चर्ल्स सघ्याचे किंग चार्ल्स यांच्या लग्न सोहळ्यात राणी ऐलिझाबेथ यांनी डबेवाल्यांना लग्न सोहळ्यासाठी विशेष निमंत्रीत केले होते.
त्या लग्न सोहळ्यात राणी ऐलिझाबेथ दुसरी प्रत्यक्ष डबेवाल्यांच्या प्रतिनिघींना आवर्जुन भेटली होती तसेच त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. डबेवाल्यांनसाठी ही गौरवास्पद बाब होती. राणी तसेच राज घराण्याने मुंबईच्या डबेवाल्यांना दिलेली वागणुक तसेच कायम ठेवलेले संबंध हा चर्चेचा विषय असतो. डबेवाले आणि राज घराण्यामधे आनंदाच्या क्षणांमधे सहभागी होतात. ऐलिझाबेथ द्वितीय मुंबईच्या डबेवाल्यांचे मित्र प्रिन्स चार्ल्स यांची त्या आई होत्या. मुंबईचा डबेवाला आणि प्रिन्स चार यांचे एक वेगळे नाते आहे.
प्रिन्स चार्ल्स डबेवाल्यांना मुंबईत येऊन भेटले आणी डबेवाले प्रकाशात आले. त्या नंतर प्रिन्स चार्ल्स ने त्यांना दुसऱ्या लग्नाला दोन डबेवाल्यांना लग्नाला लंडनला निमंत्रित केले होते. तसेच प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले. तेव्हा मुंबईच्या डबेवाला कडून त्यांच्या नातवाला महाराष्ट्राची ओळख असलेले आणि कौटुंबिक प्रथे प्रमाणे चांदीची कंबर साखळी आणि आंगड- टोपडे पाठवण्यात आले होते. इंग्लंडच्या राजघराण्याची डबेवालाचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. महाराणीच्या निधना नंतर डबेवाल्यांनी शोक व्यक्त करताना राणीच्या जाण्याचे दुख: आहे पण मीत्र राजा झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रीया दिली होती. आज डबेवाला असोशिएशन ने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो ही प्रार्थना असा संदेश देत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.