ETV Bharat / state

Cylinder exploded : दादर छबिलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट; ३ कामगार जखमी - दादर छबिलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट

मुंबईच्या दादर येथील छबिलदास शाळेच्या ( Chabildas School ) अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉल ( Akshikar Tamhane Community Hall) मध्ये आज सकाळी ५ च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट ( cylinder exploded ) झाला.

cylinder exploded
दादर छबिलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट
author img

By

Published : Nov 2, 2022, 10:50 AM IST

मुंबई : मुंबईच्या दादर येथील छबिलदास शाळेच्या ( Chabildas School ) अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉल ( Akshikar Tamhane Community Hall) मध्ये आज सकाळी ५ च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट ( cylinder exploded ) झाला. यामुळे ३ कामगार जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल (Admitted to Sion Hospital ) करण्यात आले आहे. दरम्यान शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धोकादायक भाग तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दादर छबिलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट

३ जण जखमी : दादर पश्चिम येथे छबिलदास शाळा आहे. या शाळेत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉल मध्ये आज सकाळी ५ च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले आहेत. भरत सिंग २६ वर्षीय पुरुष हा ६० ते ७० टक्के भाजला आहे. जावेद अली ३८ वर्षीय पुरुष याच्या डोक्यावर सीलिंग पडल्याने डोक्याला मार लागला आहे. गोपाल साहू ५० वर्षीय पुरुष याच्यावर कॅज्युलटी विभागात उपचार सुरू आहेत.

धोकादायक भाग पाडण्याचे काम सुरू : सिलेंडर स्फोटामुळे शाळेमधील सामानाचे आणि वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिलेंडर स्फोटामुळे शाळेतील सामना बाजूच्या रस्त्यावर आणि शाळेच्या आवारात पडले आहे. शाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागाने याची पाहणी केली असून या इमारतीचा काही भाग धोकादायक झाला आहे. हा धोकादायक भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.