ETV Bharat / state

Monsson update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास, मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - महाराष्ट्र मान्सून अपडेट्स

मुंबईत मान्सूनचा पाऊस होण्यासाठी 11 जूनची वाट पाहावी लागते. परंतु यंदा मात्र 14 पर्यंत मान्सूनची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारी रात्री पाऊस झाला. आज सोमवारी मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Monsson update
मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
author img

By

Published : Jun 12, 2023, 8:41 AM IST

मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने पुढचा प्रवास सुरू केला आहे. दक्षिण कोकणात मान्सून रविवारी दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. परंतु मुंबईत मान्सूनला येण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. साधरण १४ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी रात्री मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस झाल्याचे आयएमडी अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई शहर तसेच राज्याच्या किनारपट्टीच्या भागातही जोरदार वारे वाहू लागले कारण बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता राज्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे.

मुंबईत मान्सूचा नेहमी खेळ : रविवारी मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, गोवा, दक्षिण कोकण, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या भागात दाखल झाला. आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य भाग तसेच वायव्य भाग आणि ईशान्येकडील उर्वरित भागात मान्सून धडकला आहे. दरम्यान मान्सून महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत येत असतो. परंतु यावेळी एक दिवस उशीर झाला आहे. मुंबईत मान्सूनचा पाऊस होण्यासाठी 11 जूनची वाट पाहावी लागते. परंतु यंदा मात्र 14 पर्यंत मान्सूनची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मुंबईत 11 जूनला मान्सून आला होता. तर 2021 ला 9 जूनलाच हजेरी लावली होती. 2020 मध्ये मुंबईकरांना मान्सूनच्या पावसासाठी परत 14 जूनची वाट पाहावी लागली होती.

मुंबईत रविवारी रात्री पाऊस : मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारी रात्री पाऊस झाला. रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामानाचा अंदाज खरा ठरवत वरुणराजाने हजेरी लावली. शनिवारीही मुंबईत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची उपस्थिती होती. दरम्यान आज मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही 13 ते 15 जून दरम्यान हलक्या सरीचा पाऊस होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा-

  1. Railway Pre Monsoon Work: मान्सूनपूर्व कामे रेल्वे प्रशासनाकडून पूर्णत्वाकडे
  2. Cyclonic Storm Biparjoy :चक्रीवादळ बिपरजॉयची अत्यंत तीव्र चक्री वादळात रुपांतर होण्याची शक्यता; मुंबईने अनुभवला सर्वात जास्त उष्ण दिवस
  3. Mansoon Arrived In Maharashtra: खुशखबर! महाराष्ट्रात मान्सून दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.