ETV Bharat / state

Online Financial Fraud Mumbai: विद्युत बिल थकित असल्याचा मॅसेज आला....Appवर माहिती भरताच बॅंकेतून लाखो रुपयांची चोरी - विद्युत बिल थकित असल्याचा मॅसेज

विद्युत पुरवठा बंद करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे. या गुन्हेगारांनी त्याला मेसेज करून आपले इलेक्ट्रिक बिल थकीत आहे, जर त्याने ते न भरल्यास घराचे विद्युत कनेक्शन तोडून टाकू, असे सांगितले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Online Financial Fraud Mumbai
बॅंकेतून लाखो रुपयांची चोरी
author img

By

Published : Apr 30, 2023, 10:59 PM IST

मुंबई: वांद्रे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त डॉमिनिक फर्नांडिस (७६) यांना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर CP-GOUSES नावाचा मेसेज आला. त्यावर लिहिले होते की, प्रिय ग्राहक तुमची वीज रात्री 9 वाजता खंडित करण्यात येणार आहे. कृपया अधिक तपशीलसाठी - कॉल 89812 **** धन्यवाद Gouse Silar.

टीम व्ह्यूअर एप डाउनलोड केले आणि...: हा मेसेज आल्यानंतर फर्नांडिस यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करून सांगितले की, आपण इलेक्ट्रिक बिल भरले आहे, मग तो मेसेज का आला, त्यावर कॉल रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितले की, तुम्ही बिल भरले नाही; कारण ऑनलाइन तुमचे बिल पेडींग दाखवत आहे. कॉल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राहुल शर्मा असल्याचे सांगितले आणि तुम्ही बिल भरले असेल तर ते ऑनलाइन अपडेट करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर शर्मा यांनी फर्नांडिसला टीम व्ह्यूअर एप डाउनलोड करण्यास सांगितले, जे फर्नांडिसने डाउनलोड केले. यानंतर त्यांना एपमध्ये बँक खात्याचा तपशील टाकण्यास सांगण्यात आले.

अन् बॅंक खात्यातून पैशांचे डेबिट: त्यानंतर शर्मा याने फर्नांडिस यांचा एटीएम कार्ड क्रमांक आणि सीव्हीव्ही क्रमांक मागितला, तो त्यांनी दिला. शर्मा यांनी फर्नांडिस यांच्या पत्नीच्या बँक खात्याचे तपशील मागितले असता त्यांनी तेही दिले. यानंतर फर्नांडिस आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून अनेक वेळा पैसे कापून दुसऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. फर्नांडिस आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एकूण 3 लाख 14 हजार रुपये डेबिट करण्यात आले. यानंतर फर्नांडिस यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ४१९,४२० आणि आयटी कायदा ६६(सी), ६६(डी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. देशभरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष करून वृद्धांना फसविले जात आहे. त्यामुळे अशा मॅसेज किंवा फोनकॉलपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: Building Collapsed in Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटना; इमारत मालकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.