मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे अशा लोकांविरोधात राज्याच्या सायबर पोलीस विभागाने २२७ गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात २६ नोंदविले गेले असून पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १५, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलडाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १, धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आक्षेपार्ह व्हाट्सअॅप पोस्ट प्रकरणी १०४ गुन्हे दाखल झाले आहेत. याबरोबरच आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ७५ गुन्हे, टिकटॉक छायाचित्रीकरण फित शेअरप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहे. ट्विटरवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे, तर अन्य समाज माध्यमाचा (ध्वनी फित , यु ट्युब) गैरवापर केल्याप्रकरणी ३९ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे.
मुंबई-लातुरात सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न -
मुंबईमधील आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये १ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्यात आरोपी महिलेने आपल्या फेसबुक व ट्विटर प्रोफाईलवर कोरोना महामारीच्या काळात दोन धर्मात तेझ निर्माण होईल आणि त्यामधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशा पोस्ट टाकल्या होत्या. लातूरमधील एका गुन्ह्यातील आरोपीने आपल्या टिकटॉक खात्याचा वापर करून धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रसारीत केला होता. याप्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आली.
लॉकडाऊन काळात राज्यात सायबर पोलिसांकडून 227 गुन्हे दाखल - लॉकडाऊनमधील गुन्हेगारी