ETV Bharat / state

बनावट ऑक्सिमीटर अ‌ॅप्सच्या माध्यमातून लूट; खबरदारी घेण्याचा सायबर तज्ज्ञांचा सल्ला

author img

By

Published : Aug 7, 2020, 3:37 PM IST

अ‌ॅप्सच्या माध्यमातून मालवेअर किंवा व्हायरस मोबाईल फोनमध्ये जाऊ शकतो. या व्हायरस किंवा मालवेअरमुळे मोबाईलधारकांच्या मोबाईलमधील बँकिंग व्यवहारांच्या संदर्भातील गोपनीय माहिती ज्यात डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, ओटीपी, बँकिंग युजरनेम व पासवर्ड सायबर गुन्हेगारांकडे जाऊन आर्थिक लूट केली जात आहे.

बनावट ऑक्सिमिटर अ‌ॅप्सच्या माध्यमातून लूट; खबरदारी घेण्याचा सायबर तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई - कोरोना संक्रमण लक्षात घेता नागरिकांमध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण झाल्यामुळे याचा फायदा सायबर गुन्हेगार घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या स्मार्टफोनवर शरिरातील ऑक्सिमीटर व पल्स रेट मोजणारे अ‌ॅप्स डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले असून यांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांचा गोपनीय डेटा चोरत असल्याचे समोर आले आहे.

बनावट ऑक्सिमीटर अ‌ॅप्सच्या माध्यमातून लूट; खबरदारी घेण्याचा सायबर तज्ज्ञांचा सल्ला

सध्या मोबाईल इंटरनेटवर वेगवेगळे ऑक्सिमीटर अ‌ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल फोनच्या कॅमेरावर बोट ठेवून शरिरातील ऑक्सिजन मात्रा व पल्स रेटचे प्रमाण तंतोतंत दाखविल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मोबाईल अ‌ॅप्सच्या माध्यमातून डिजिटल बायोमेट्रिक ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांचा गोपनीय डेटा चोरला जाण्याची शक्यता असल्याचे सायबर तज्ज्ञ अंकूर पुराणिक यांचे म्हणणे आहे. ऑक्सिमीटर अ‌ॅप्समध्ये कुठल्याही प्रकारचे इंफ्रा रेड लाईट व नियर इन्फ्रा रेड लाईट आणि सेन्सर नसल्याने याला अ‌ॅप्सच्या माध्यमातून शरिरातील ऑक्सिजन व पल्स रेट मोजले जाऊ शकत नाहीत. अशाप्रकारच्या अ‌ॅप्सच्या माध्यमातून मालवेअर किंवा व्हायरस मोबाईल फोनमध्ये जाऊ शकतो. या व्हायरस किंवा मालवेअरमुळे मोबाईलधारकांच्या मोबाईलमधील बँकिंग व्यवहारांच्या संदर्भातील गोपनीय माहिती ज्यात डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, ओटीपी, बँकिंग युजरनेम व पासवर्ड सायबर गुन्हेगारांकडे जाऊन आर्थिक लूट केली जात आहे.

काय करायला हवे?

स्मार्ट फोनवरून बँकिंग संदर्भातील अर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या मोबाईल फोनवर ऑक्सिमीटर मोजणारे कुठलेही अ‌ॅप्स डाऊनलोड करण्यापूर्वी सावध राहिले पाहिजे असे सायबर एक्स्पर्ट अंकूर पुराणिक यांचे म्हणणे आहे. सध्या इंटरनेटवर, सोशल माध्यमांवर शरिरातील ऑक्सिजन व पल्स रेट मोजणारे अ‌ॅप्सची लिंक मोठ्या प्रमाणात फिरताना आढळून येत आहे. मात्र, अशाप्रकारची कुठल्याही लिंकवर मोबाईलधारकांनी क्लिक करू नये. स्मार्टफोन वापरणाऱ्या मोबाईलधारकांनी त्यांचा मोबाईल ऑपरेटर देत असलेल्या अधिकृत अ‌ॅप्सच्या माध्यमातून वापर करण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.