नवी मुंबई Crypto Currency Investment Fraud: अल्पावधीत भरघोस परतावे देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या दोन महाभागांना नवी मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून गजाआड (Two Arrested In Financial Fraud Case) केले आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या माध्यमातून योग्य वेळी कारवाई केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या महाभागांची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहे. त्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. (Crypto Currency Fraud)
ऑगस्टमध्ये दाखल केली फसवणुकीची तक्रार: नवी मुंबई परिसरातील एका व्यक्तीशी अर्चना नायर असे नाव सांगून एका महिलेने फोनवरून मैत्री केली. चांगल्या परताव्याची हमी देत त्याला क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला पैसे गुंतवल्यानंतर संबंधित व्यक्तीला परतावे मिळाले. मात्र मोठी रक्कम गुंतवल्यानंतर हे परतावे मिळणं बंद झाले. यानंतर आरोपीशी संपर्क होणं देखील बंद झाले. जवळपास 6 कोटी 62 लाख, 29 हजार 888 इतकी रक्कम फिर्यादीने संबधित महिलेच्या सांगण्यावरून गुंतवली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबधित व्यक्तीने नवी मुंबई गुन्हे शाखा व सायबर गुन्हे शाखा येथे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींना केले गजाआड: क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून फसवणूक केल्या संदर्भात पोलिसांनी नंतर बाळू सखाराम खंडागळे (42) आणि राजेंद्र रामखिलावन पटेल (52) या दोघांना अटक केली आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक, बँक खात्याचे तपशील, चेकबुक आणि एटीएम कार्ड इतरांना दिल्याचे उघड झाले. हे आरोपी बाहेरील राज्यांतील आरोपींच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सपो आयुक्त गजानन राठोड यांनी दिली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँक खाती गोठवली: नवी मुंबई सायबर पोलिसांनी क्रिप्टो करन्सीच्या फसवणुकीचा तपास करत 32.66 कोटी रुपयांची आरोपींची अनेक बँक खाती गोठवली आहेत. सायबर पोलीस आणि नवी मुंबई पोलीस या फसवणुकीच्या घटनेचा तपास करत आहे.
हेही वाचा: