मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरी भागांमध्ये कलम 144 लागू करत असल्याची घोषणा रविवारी केली. पण, मुंबईकरांनी या आदेशाला केराची टोपली दाखली आहे. लोक आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
रविवारी (दि. 23 मार्च) ओस पडलेल्या रस्त्यावर पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे. मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची रांग दिसून येत होती. राज्य सरकारकडून वारंवार घरी बसा, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी मुंबईकर त्याला जास्त गंभीरपणे घेत नसल्याचे चित्र आहे. टोलनाक्यावर पोलीस ही तैनात करण्यात आले. ज्यांची अत्यावश्यक कामे आहेत त्यांना तपासून पुढे सोडण्यात येत आहे.
हेही वाचा - COVID19: 'सरकारने योग्य पावले उचललीत...' राज ठाकरेंकडून सरकारचे कौतुक