ETV Bharat / state

मुंबईत लॉकडाऊनचा असाही परिणाम.. मोठ्या गुन्ह्यांच्या घटनांत ७० टक्के घट

एप्रिल महिन्यात मुंबई शहरात तब्बल 425 मोठे गुन्हे घडले आहेत. ज्यात 159 प्रकरणांचा छडा पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान लावला आहे. तर, मार्च महिन्यात मुंबईत मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण 1399 इतके होते. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात मुंबईतील मोठे गुन्हे 70 टक्के कमी झाले आहेत.

crimes in mumbai drop by seventy percent
लॉकडाऊनचा मुंबईत सकारात्मक परिणाम
author img

By

Published : May 11, 2020, 12:32 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील विविध परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. याचा शहरात सकारात्मक परिणाम होत आहे. मुंबईसारख्या शहरात एरवी घडणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

1 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान मुंबई शहर तसेच उपनगरात खून, दरोडा, बलात्कार आणि दंगलीसारख्या घटना कमी झाल्या आहेत. यावरच आजचा हा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.

गेल्या दोन महिन्यात मुंबई शहरातील 94 पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले गुन्हे -

हत्या - एप्रिल 8, मार्च - 12

खुनाचा प्रयत्न - एप्रिल 11, मार्च 27

दरोडा - एप्रिल 0, मार्च 1

चेन स्नॅचिंग- एप्रिल 0, मार्च 14

खंडणी - एप्रिल 4, मार्च 13

घरफोडी - एप्रिल 66, मार्च 110

चोरी - एप्रिल 34, मार्च 301

वाहन चोरी - एप्रिल 84, मार्च 193

जखमी करणे - एप्रिल 134, मार्च 324

दंगली - एप्रिल 14, मार्च 73

बलात्कार - एप्रिल 17, मार्च 73

विनयभंग - एप्रिल 36, मार्च 235

एप्रिल महिन्यात मुंबई शहरात तब्बल 425 मोठे गुन्हे घडले आहेत. ज्यात 159 प्रकरणांचा छडा पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान लावला आहे. तर, मार्च महिन्यात मुंबईत मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण 1399 इतके होते. ज्यात तब्बल 721 प्रकरणांचा छडा लावला आहे. एप्रिल महिन्यात पोलिसांनी संचारबंदी दरम्यान कलम 144, कलम 188 व इतर आयपीसी कलमानुसार 5 हजार 703 गुन्हे दाखल करून 4 हजार 955 गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात मुंबईतील मोठे गुन्हे 70 टक्के कमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.