ETV Bharat / state

मुंबईतील मुद्रांक शुल्क दोन टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी

author img

By

Published : Jun 2, 2021, 3:04 PM IST

मागील दोन महिन्यात घर विक्री पर्यायाने मुद्रांक शुल्क वसुलीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घर विक्रीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क कपात करावी. त्यानुसार मुंबईतील मुद्रांक शुल्क दर 5 टक्क्यांऐवजी 2 टक्के करावी.

मुंबईतील मुद्रांक शुल्क दोन टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी
मुंबईतील मुद्रांक शुल्क दोन टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. मागील दोन महिन्यात घर विक्री पर्यायाने मुद्रांक शुल्क वसुलीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घर विक्रीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क कपात करावी. त्यानुसार मुंबईतील मुद्रांक शुल्क दर 5 टक्क्यांऐवजी 2 टक्के करावी. तर उर्वरित राज्यात 6 टक्क्यांऐवजी 3 टक्के मुद्रांक शुल्क दर करावेत, अशी मागणी बिल्डरांच्या क्रेडाय-एमसीएचआय संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल 2020पासून घर विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट झाली. मुंबईत तर एप्रिलमध्ये एकही घर विकले गेले नाही आणि या अनुषंगाने एकही रुपया मुद्रांक शुल्क मिळाले नाही. तर राज्यात ही एप्रिल 2020 मध्ये केवळ 777 घरे विकली गेली आणि यातून केवळ 3 कोटी 11 लाखांचा महसूल मिळाला होता. हा आजवरचा सगळ्यात कमी महसूल आणि घरविक्री ठरली. पुढे ऑक्टोबरपासून घर विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीत हळूहळू वाढ होऊ लागली. त्याचा फायदा होताना दिसला. डिसेंबरमध्ये 2020 मध्ये अडीच लाखांहून अधिक घरे विकली गेली. तर यातून तब्बल 2 हजार 464 कोटीचा महसूल मिळाला होता. त्यानंतर मार्च 2021 मध्ये तर सरकारला विक्रमी महसूल मिळाला. या महिन्यात 2 लाख 13 हजार 413 घरे विकली गेली आणि यातून विक्रमी 9 हजार 66 कोटी रुपये इतका महसूल मिळाला. पण एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि पुन्हा घर विक्री-मुद्रांक शुल्क वसुली मंदावली. एप्रिलमध्ये सरकारला केवळ 1 हजार 256 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर केवळ 94 हजार 813 घरे विकली गेली. मे मध्ये हा आकडा आणखी खाली आला. मे मध्ये केवळ 66 हजार 534 घरे विकली गेली आणि यातून फक्त 874 कोटीचा महसूल मिळाला. एकूणच महसूल कमी झाल्याचे चित्र आहे.

'...अन्यथा बांधकाम क्षेत्राला खीळ बसेल'
कोरोना-लॉकडाऊनचा फटका बांधकाम व्यवसायला बसला आहे, बसत असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढेही ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सप्टेंबर 2020 मध्ये मुद्रांक शुल्क दरात कपात करण्यात आली होती. या दरकपातीचा मोठा फायदा झाला. पण आता ही सवलत संपुष्टात आल्याने पुन्हा महसूल आणि घरविक्री घटली आहे. त्यामुळे जर मुंबईतील मुद्रांक शुल्क दर 5 वरून 2 टक्के तर उर्वरित राज्यात 6 वरून 3 टक्के मुद्रांक शुल्क दर करावेत अशी मागणी क्रेडाय-एमसीएचआय ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.