मुंबई संपूर्ण देशासह महाराष्ट्रात तसेच मुंबईत मोठ्या उत्साहात Ganeshotsav 2022 साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच 'गणेशचित्र शाळेत' Ganesh Chitra Shala कारागीर, मूर्तिकार गणेश मूर्तीं बनवण्यात मग्न झालेले दिसत आहेत. वास्तविक पाहता यावर्षी मुंबईमध्ये गणेश मूर्तीवरील निर्बंध हटविले आहे. तरीसुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांना गणेश मूर्ती सोपवणे, हे आव्हान मूर्तिकारांसमोर Sculptor from Mumbai आहे. आणि या कमी दिवसाच्या कालावधीत मूर्ती घडवण्यासाठी उत्तर भारतीय North Indian artisans कारागिरांची Craftsmanship of North Indian artisans लाख मोलाची मदत त्यांना होतांना दिसत आहे. मुंबईतील मूर्तिकार Sculptor from Mumbai राजू शिंदे यांच्या गणेश चित्र शाळेतून याचाच आढावा घेतला आहे, ईटिव्हीच्या मुंबई येथील प्रतिनिधीने.
या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. व त्या अगोदर गणेश भक्तांना, त्यांच्या आवडत्या विविध रूपांतील गणपतीच्या मुर्त्या देण्याचे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. अशातच करोनामुळे मागील दोन वर्षांपासून असलेले गणेश मूर्तीवरील निर्बंध यंदा हटवण्यात आले आहेत. ही सर्व गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब असली तरी; या मुर्त्या बनवण्यासाठी फारच कमी कालावधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. विशेष करून सार्वजनिक गणेश मूर्तींच्या उंचीवर यंदा निर्बंध नसल्याने, या मुर्त्या ८ फुटापासून २२ फुटांपर्यंत उंचच उंच घडविण्यात येत आहेत. मुंबईतील परळ येथील मूर्तिकार राजू शिंदे यांच्या 'गणेश चित्र शाळेत' सुद्धा या मुर्त्या घडवण्याचे काम जोमाने सुरू आहे. विशेष करून यंदा सरकारने फार उशिरा निर्बंध हटवण्याची घोषणा केल्याने, मूर्तीकारांकडे या मुर्त्या बनवण्यासाठी फारच कमी कालावधी उरला आहे. त्याचबरोबर मे महिन्यापर्यंत उत्तर भारतीय कारागीर हे कामासाठी मुंबईत गणेश चित्र शाळेमध्ये दाखल होतात. परंतु यंदा अद्याप मोठ्या प्रमाणामध्ये कारागीर उपलब्ध नसले तरीसुद्धा, आता जे उपलब्ध कारागीर आहेत त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचे मूर्तिकार राजू शिंदे यांनी सांगितले.
उत्तर भारतीय कारागिरांची संख्या फार मोठी मागील २५ वर्षांपासून मुंबईतील चित्र शाळेत गणपती साकारण्याचे काम करणारे ५६ वर्षीय (उत्तर प्रदेश) अमेठीचे रामराज यादव हे आजही त्या जोमाने मुंबई चित्र शाळेत काम करताना दिसून येतात. रामराज यादव यांच्या सांगण्याप्रमाणे गणपतीच्या काळात ते दरवर्षी गणपती साकारण्याचे काम करत आले आहेत. वास्तविक पाहता ते सिनेमा क्षेत्रात फिल्म सिटी मध्ये मदतनीस चे काम करत असतात. परंतु गणपतीच्या दरम्यान न चुकता ते गणपती साकारण्याचे काम मुंबईत करत आले आहेत. रामराज यादव यांच्याप्रमाणे बरेच उत्तर भारतीय विशेष करून १८ वर्षांपासून ६० वर्षापर्यंत वयोगटातील कारागीर हे मोठ्या आवडीने गणपती साकारण्याचे काम मुंबईत करत आले आहेत, व आजही करताहेत.
विघ्नहर्ता आगमनासोबतच देतो इतरांना रोजगाराच्या संधी विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या आगमना बरोबर केवळ आनंद, उत्साह घेऊन येत नाही तर; त्याच्या निमित्ताने बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देतो. आणि त्याची प्रचिती या निमित्ताने मुंबईतील गणेशचित्र शाळेत येत आहे. गणपतीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कारागिरांना कमीत कमी ४०० रुपये ते ३ हजार रुपये पर्यंत दिवसागणित पगार दिला जातो. त्यातच अधिक वेळ ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, पगारात आणखी वाढ होते. या कामाची आवड असल्याकारणाने हे कारागीर वर्षभर इतरत्र कुठलेही काम करत असले, तरी सुद्धा गणपतीच्या काळात आवडीने गणेश चित्रशाळेत जात असतात. मुंबईतच विविध गणेशचित्र शाळांमध्ये उत्तर भारतीय कारागरांची संख्या ही ८०० पेक्षा जास्त आहे.