ETV Bharat / state

Vivek Phansalkar : एकुलत्या एक मुलीचं कन्यादान सोडून पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ऑन ड्युटी - पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ऑन ड्युटी

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (CP Vivek Phansalkar on duty) यांच्या एकूलत्या एक मुलीचा आज विवाह सोहळा असताना सुद्धा, ते स्व:त महाविकास आघाडीच्या महामोर्च्याच्या बंदोबस्तात कर्तव्यावर हजर (arrangement of Mahavikas Aghadi Mahamorcha) होते. मुलीचं लग्न असताना सुद्धा त्यांनी ड्यूटीला प्रधान्य दिल्याने सर्व स्तरातुन त्यांचं कौतुक होत (Everyone Appreciated Him) आहे.

Vivek Phansalkar
मुलीचं कन्यादान सोडून सीपी ऑन ड्युटी
author img

By

Published : Dec 17, 2022, 7:52 PM IST

मुंबई : आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा पार पडला आहे. या महामोर्च्यात मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळसाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष आदी पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सामील झाले. मुंबईत मोठ्यासंख्येत कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (CP Vivek Phansalkar on duty) यांच्या एकूलत्या एक मुलीचा आज विवाह सोहळा असताना, सुद्धा ते बंदोबस्तात स्व:त हजर (arrangement of Mahavikas Aghadi Mahamorcha) होते. मुलीचं लग्न असताना सुद्धा त्यांनी ड्यूटीला प्रधान्य दिल्याने सर्व स्तरातुन त्यांचं कौतुक होत (Everyone Appreciated Him) आहे.

महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची वक्तव्ये याविरोधात महाविकास आघाडीने महामोर्च्याची हाक दिली होती. आज 12 वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात विवेक फणसाळकरही रस्त्यावर उतरून सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेत होते.

दुसरीकडे त्यांच्या सुकन्या मैत्रयी हिचा आज जुहू येथे विवाह पार पडला. असे असताना पोलीस आयुक्त सुट्टी न घेता आघाडीच्या मोर्चासाठी कर्तव्य बजावत होते. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेसाठी नेटकऱ्यांनी त्यांना सलाम केला. फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. जुलै 2018 मध्ये यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता.

सण, उत्सवांमध्येही पोलिसांना कर्तव्यावर राहवे लागते. याला पोलिस आयुक्तही अपवाद ठरले नाहीत. आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न सोडून त्यांना आपल्या कर्तव्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेत आणि मोर्चाचा पोलिस बंदोबस्त पाहण्यासाठी हजर राहवे लागले. याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. घरात मुलीच्या लग्नाची धामधुम सुरु असतानाही त्यांना मोर्चाचा मार्ग, त्यासाठी तैनात असलेला फौजफाटा आणि सुरक्षा याचा आढावा घेण्यासाठी जातीने हजर राहवे लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.