ETV Bharat / state

राज्यात २३२ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान; एकूण रुग्ण संख्या २९१६ तर २९५ रुग्णांना डिस्चार्ज - rajesh topa corona patient

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 15, 2020, 10:03 PM IST

Updated : Apr 16, 2020, 9:12 AM IST

मुंबई - आज (15 एप्रिल) राज्यात कोरोनाबाधीत २३२ नविन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या २९१६ झाली आहे. दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका १८९६ ११४
ठाणे १२ ०
ठाणे मनपा ९७ ३
नवी मुंबई मनपा ६८ ३
कल्याण डोंबवली मनपा ५० २
उल्हासनगर मनपा १ ०
भिवंडी निजामपूर मनपा १ ०
मीरा भाईंदर मनपा ५१ २
पालघर ५ १
वसई विरार मनपा ३२ ३
रायगड ५ ०
पनवेल मनपा १० १
ठाणे मंडळ एकूण २२२८ १२९
नाशिक २ ०
नाशिक मनपा २ ०
मालेगाव मनपा ४८ २
अहमदनगर १० १
अहमदनगर मनपा १७ ०
धुळे २ १
धुळे मनपा ० ०
जळगाव १ ०
जळगाव मनपा १ १
नंदूरबार ० ०
नाशिक मंडळ एकूण ८३ ५
पुणे १० ०
पुणे मनपा ३६२ ४०
पिंपरी चिंचवड मनपा ३५ १
सोलापूर ० ०
सोलापूर मनपा २ १
सातारा ६ २
पुणे मंडळ एकूण ४१५ ४४
कोल्हापूर १ ०
कोल्हापूर मनपा ५ ०
सांगली २६ ०
सांगली मिरज कुपवाड मनपा ० ०
सिंधुदुर्ग १ ०
रत्नागिरी ६ १
कोल्हापूर मंडळ एकूण ३९ १
औरंगाबाद ० ०
औरंगाबाद मनपा २३ २
जालना १ ०
हिंगोली १ ०
परभणी ० ०
परभणी मनपा ० ०
औरंगाबाद मंडळ एकूण २५ २
लातूर ० ०
लातूर मनपा ८ ०
उस्मानाबाद ४ ०
बीड १ ०
नांदेड ० ०
नांदेड मनपा ० ०
लातूर मंडळ एकूण १३ ०
अकोला ० ०
अकोला मनपा १३ १
अमरावती ० ०
अमरावती मनपा ६ १
यवतमाळ ५ ०
बुलढाणा २१ १
वाशिम १ ०
अकोला मंडळ एकूण ४६ ३
नागपूर ५ ०
नागपूर मनपा ५० १
वर्धा ० ०
भंडारा ० ०
गोंदिया १ ०
चंद्रपूर ० ०
चंद्रपूर मनपा ० ०
गडचिरोली ० ०
नागपूर एकूण ५६ १
इतर राज्ये ११ २
एकूण २९१६ १८७

(हा अहवाल १५ एप्रिल २०२० च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५३९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Last Updated : Apr 16, 2020, 9:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.