मुंबई : पोक्सो न्यायालयाने नराधम बापाला कठोर शिक्षा सुनावली. जन्मदात्या बापाने आपल्या 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने जीन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नराधम बापाने चिमुरडीवर 12 ऑक्टोबर 2020 रोजी अत्याचार केला होता. त्या संदर्भात मुंबईच्या पोक्सो न्यायालयात गुन्हा दाखल झाला. पोक्सो अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यानुसार स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात बापाला कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश नाझीरा शेख यांनी या प्रकरणात निरीक्षण नोंदवले आहेत.
वडील हा रक्षक आहे तो पालक आहे, पण भक्षक बनला. त्याने त्या भूमिकेला जागला नाही, म्हणून कठोर शिक्षा ठोठावत आहे" - न्यायालय
रक्षक बाप बनला भक्षक : 12 ऑक्टोबर 2020 या दिवशी पीडित मुलगी घरात होती, तिची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरात पीडिता एकटी होती. या मुलीला 4 भाऊ देखील आहेत, तेही घरात होते. मात्र ते लहान आहेत. परंतु बापाने लहान बालिकेला ओढलं आणि अत्याचार करू लागला. पीडितेची आई सायंकाळी घरी परतल्यानंतर तिला मुलगी ओरडत असल्याचे दिसले. स्वतः च्या मुलीवर बाप अत्याचार करत असल्याचे पाहून आईच्या पायाखालची जमीन सकरली. तिने मुलीची अत्याचारीत बापापासून सुटका केली आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर आईने मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला.
नवऱ्याला सोडण्याची विनंती : गुन्हा नोंदवल्यानंतर खटला विशेष न्यायालयात उभा राहिला. परंतु आपले कुटुंब गरीब आहे. बाप जर तुरुंगात गेला, तर आपणच घरामध्ये एकमेव कमावणारी व्यक्ती असणार आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबावर हलाखीचे दिवस येतील. केवळ कुटुंबाचे आर्थिक उदरनिर्वाह चालण्यासाठी बापाला सोडावे, अशी इच्छा मुलीच्या आईने न्यायाधीशांसमोर व्यक्त केली होती. परंतु न्यायाधीशांनी "समाजामध्ये अशा निकालातून न्यायचा संदेश देणे गरजेचे असल्याची बाब नमूद केली. जेव्हा रक्षक पिता हाच भक्षक बनतो. त्यावेळेला कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. मुंबईतील पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश नाझिरा शेख यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी बापाला जन्मठेप शिक्षा सुनावली. "हल्लेखोराविरुद्ध लहान बालके साक्ष देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे तोंडी साक्षी पेक्षा जे कागदपत्र पुरावे उपलब्ध झालेले आहेत. ते पुरेसे आहेत, असे न्यायालयाने निकाल पत्रात नमूद केले.
हेही वाचा -