मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. एनसीबीने या संदर्भात आणखी एक कारवाई केली आहे. एनसीबीकडून मुंबईत काही ठिकाणी छापे मारण्यात आले. या कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल, हस्तगत करण्यात आले आहेत. यासंदर्भात अनुज केशवानी या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अनुज केशवानी याची रवानगी पाच दिवसांच्या एनसीबी कोठडीत केली आहे.
हेही वाचा-सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात
गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्ज सिंडीकेट लक्षात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कैजाण इब्राहिम या आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला सत्र न्यायालयाकडून 10 हजारांचा जामीन मिळालेला आहे. कैजाण इब्राहिम याच्या चौकशीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या माहितीवरून अनुज केशवाणी याचे नाव समोर आले होते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनुज केशवानी याच्याकडून 590 ग्राम हाशिश, 664 एलसीडी पेपर, 304 ग्राम मारीजुना कॅप्सूल, 1 लाख 85 हजार रुपये यासह 5000 इंडोनेशियन चलन जप्त करण्यात आलेले आहेत.