ETV Bharat / state

पीएनबी घोटाळा : नीरव मोदीला 7, 300 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी हिरा व्यापारी नीरव मोदीला पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाचे न्यायाधीश दीपक ठक्कर यांनी 2 वेगवेगळ्या दाव्यांमध्ये व्याजासहित ७,३०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

author img

By

Published : Jul 6, 2019, 1:57 PM IST

निरव मोदी

पुणे - पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी हिरा व्यापारी नीरव मोदीला पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाने दणका दिला आहे. न्यायाधीश दीपक ठक्कर यांनी नीरव मोदीला 2 वेगवेगळ्या दाव्यांमध्ये व्याजासहित ७ हजार ३०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणाविषयी माहिती देताना श्रिकांत अबूज, रजिस्ट्रार, डी.आर.टी, पुणे

प्राथमिक माहितीनुसार, नीरव मोदी याच्या विरुद्ध पंजाब नॅशनल बँकेने मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणामध्ये तीन वेगवेगळे दावे दाखल केले होते. मात्र, मुंबई येथील न्यायाधीशांची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या दाव्याची सुनावणी पुण्याच्या न्यायाधिकारणामध्ये पार पाडण्यात आली. त्यानंतर १२ जूनला दोन दाव्यांची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी नीरव मोदीच्या वतीने न्यायालयात कोणीही हजर नव्हते.

दरम्यान, पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाने आज दोन्ही दाव्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेची मागणी मान्य केली आहे. न्यायालयाने नीरव मोदीला पहिल्या दाव्यामध्ये ७०२९ कोटी आणि दुसऱ्या दाव्यामध्ये २३२.१५ कोटी रुपये व्याजासहित जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई कर्जवसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी नीरव मोदीकडून ही रक्कम वसूल करणार आहेत.

Intro:पुणे - पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी हिरे व्यापारी निरव मोदीला पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाचे न्यायाधीश दीपक ठक्कर यांनी 2 वेगवेगळ्या दाव्यांमध्ये व्याजासहित 7,300 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Body:प्राथमिक माहितीनुसार, निरव मोदी याच्या विरुद्ध पंजाब नॅशनल बँकेने मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकारणामध्ये तीन वेगवेगळे दावे दाखल केले होते. मात्र, मुंबई येथील न्यायाधीशांची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या दाव्याची सुनवणी पुण्याच्या न्यायाधिकारणामध्ये पार पडली आहे. त्यानंतर 12 जून रोजी दोन दाव्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी निरव मोदी च्या वतीने कोणीही हजर नव्हते.

दरम्यान, पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाने 6 जुलै रोजी दोन्ही दाव्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेची मागणी मान्य केली आहे. न्यायालयाने नीरव मोदीला पहिल्या दाव्यामध्ये 7029 कोटी आणि दुसऱ्या जावे मध्ये 232.15 कोटी रुपये व्याजासहित जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई कर्जवसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी नीरव मोदी कडून ही रक्कम वसूल करणार आहेत.

Byte Sent on Mojo
Byte Shrikant Abuj, Registrar, DRT Pune.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.