ETV Bharat / state

मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर नेण्याचा पालिकेचा डाव नगरसेवक पाडणार हाणून - पालिका प्रशासन

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रॉफर्ड मार्केटजवळ छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे. या मंडईची इमारत धोकादायक ठरवून विस्थापित केलेल्या मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर नेण्याचा डाव पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचा डाव हाणून पाडला जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव
author img

By

Published : Jul 13, 2019, 5:14 PM IST

मुंबई - येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरवून विस्थापित केलेल्या मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर नेण्याचा डाव पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचा डाव हाणून पाडला जाणार आहे.

मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर नेण्याच्या पालिकेचा डाव नगरसेवक हाणून पाडणार

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रॉफर्ड मार्केटजवळ छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे. या मंडईची इमारत ४ ते ५ वर्षापूर्वी धोकादायक असल्याने खाली करण्यात आली. या इमारतीमधील पालिकेची कार्यालये इतरत्र हलवण्यात आली. तर गाळेधारक व मच्छी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना बाजूला असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र, त्यानंतर आजही याठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते व्यवसाय करत आहेत. बाजूलाच असलेला भाऊचा धक्का तसेच कुलाबा येथून याठिकाणी मच्छी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. होलसेल भावात मच्छी विक्री होत असल्याने मुंबईमधून मच्छी विक्रेते याठिकाणी मच्छी विक्रीसाठी नेत आहेत.

मात्र, आता अर्धवट तोडण्यात आलेली इमारत पूर्णपणे पाडली जाणार आहे. त्यामधील मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर ऐरोली जकात नाक्यावर मार्केट बांधून दिले जाणार आहे. तर मुंबईबाहेर स्थलांतरित केल्यास आपला व्यवसाय बंद होणार असल्याने मच्छी विक्रेत्यांनी पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मच्छी विक्रेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक आता या मच्छी विक्रेत्यांच्या मदतीला धावून आले आहेत. सोमवारी सर्वपक्षीय गटनेते पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान पालिकेने आपला निर्णय बदलण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

मुंबईबाहेर फेकण्याचा डाव -

मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. कुलाबा मार्केट व भाऊचा धक्का जवळ असल्याने शिवाजी मंडई येथे होलसेल मच्छी विक्रीचा व्यवसाय चालतो. पालिकेने या मच्छी विक्रेत्यांचे ऐरोली जकात नाका येथे स्थलांतर केल्यास त्यांचा व्यवसाय बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईच्या मूळ नागरिकांना मुंबईबाहेर नेण्याचा हा डाव आहे. त्याला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. आम्ही सर्व गटनेते याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत, अशी माहिती गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

Intro:मुंबई
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरवून विस्थापित केलेल्या मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर नेण्याचा डाव पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करून सर्व पक्षीय नगरसेवकांकडू प्रशासनाचा डाव हाणून पाडला जाणार आहे.
Body:मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रॉफर्ड मार्केट जवळ छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे. या मंडईची इमारत चार ते पाच वर्षापूर्वी धोकादायक असल्याने खाली करण्यात आली. या इमारतीमधील पालिकेची कार्यालये इतरत्र हलवण्यात आली. गाळे धारक व मच्छी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना बाजूला असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र त्यानंतर आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. बाजूलाच असलेला भाऊचा धक्का तसेच कुलाबा येथून या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी आणल्या जात असल्याने होलसेल भावात या ठिकाणी मच्छी विक्री होत असल्याने मुंबईमधून मच्छी विक्रेते याठिकाणी येऊन मच्छी विक्रीसाठी नेतात.

मात्र आता अर्धवट तोडण्यात आलेली इमारत आता पूर्णपणे पाडली जाणार आहे. त्यामधील मच्छी विक्रेत्यांना मुंबईबाहेर ऐरोली जकात नाक्यावर मार्केट बांधून दिले जाणार आहे. मुंबई बाहेर स्थलांतरित केल्यास आपला व्यवसाय बंद होणार असल्याने मच्छी विक्रेत्यांनी पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मच्छी विक्रेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक आता या मच्छी विक्रेत्यांच्या मदतीला धावून आले आहेत. सोमवारी सर्व पक्षीय गटनेते पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेणार असून या भेटीदरम्यान पालिकेने आपला निर्णय बदलण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

मुंबई बाहेर फेकण्याचा डाव-
मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. कुलाबा मार्केट व भाऊचा धक्का जवळ असल्याने शिवाजी मंडई येथे होलसेल मच्छी विक्रीचा व्यवसाय चालतो. पालिकेने या मच्छी विक्रेत्यांचे ऐरोली जकात नाका येथे स्थलांतर केल्यास त्यांचा व्यवसाय बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हा मुंबईच्या मूळ नागरिकांना मुंबईबाहेर नेण्याचा डाव आहे. त्याला आमच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षांचा विरोध आहे. आम्ही सर्व गटनेते याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत अशी माहिती गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

बाईट आणि vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.