ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबईमधील बाजारपेठेत गर्दी कायम - Dadar vegetable market news

मुंबई शहरातील सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बाजारातील गर्दी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कडक निर्बंध असून सुद्धा लोक बिनधास्तपणे नियमत मोडत वावरत आहेत, याचा प्रत्यय शनिवारी दादरच्या मार्केटमध्ये दिसून आला.

mumbai market news
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबईमधील बाजारपेठेत गर्दी कायम
author img

By

Published : Apr 4, 2021, 3:03 AM IST

मुंबई - लॉकडाउन हा सर्वांसाठी सारखा नसतो. गरिबांचे मोठे हाल होतात, ही परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील लॉकडाउन प्रशासनाने उठवले. परिणामी सर्व व्यवहार सुरळीत झाला. परंतु कोरोनाचा धोका टळला आहे, असे समजू नका कारण सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने कोरोनाचा खरा धोका आता वाढलेला आहे. तेव्हा यापुढे नागरिकांनीच आपली काळजी घेणे आवश्यक आहे. आपली व आपल्या जवळीक यांची काळजी घेणे महत्त्वाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण त्यांच्या आवाहनाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही. मुंबई शहरातील सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बाजारातील गर्दी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कडक निर्बंध असून सुद्धा लोक बिनधास्तपणे निर्बंधाच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. याचा प्रत्यय शनिवारी दादरच्या मार्केटमध्ये दिसून आला.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी
लोक बिनधास्तपणे बाजारात वावरत होते. मास्क तर नावालाच होता. अनेकांनी तर मास्क लावलेच नव्हते. सुरक्षित अंतराची तर कोणालाच काळजी नव्हती. एकूणच कोरोना जणू मुंबईत नाही, असे लोक वागतांना दिसून आले. परंतु हा बिनधास्तपणा व निष्काळजीपणा आपल्याला मोठ्या संकटात टाकेल हे मुंबईकर जणूकाही विसरूनच गेले आहेत. असेच या सगळ्या चित्रावरून वाटत आहे. कारण कोरोनाचा संक्रमणाचा धोका अजूनही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. यामुळे हे संक्रमण अजून वाढण्याची शक्यता आहे हे नाकारता येत नाही आहे. प्रशासनाने आता संपूर्ण जबाबदारी नागरिकांवर सोडली आहे. तेव्हा नागरिकांनी स्वतःची ही खबरदारी घ्यावी. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कोरोना नियमावली मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेली आहेत. ती नागरिकांनी व्यवस्थितपणे पाळावी, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत असून देखील मुंबईकर ते निर्बंध पाळताना दिसून येत नाहीत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्ह माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला गर्दीच्या ठिकाणी गर्दी करू नका, असं आवाहन केले होते. तसेच दोन दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी जनतेशी संवाद साधताना दिली होती. परंतु लोकांनी याचा गांभीर्याने विचार घेतलेला नाही. त्यामुळेच दादरच्या बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.