ETV Bharat / state

प्रतीक्षा अखेर संपली..! राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये लस दाखल

author img

By

Published : Jan 13, 2021, 6:33 PM IST

Updated : Jan 13, 2021, 7:49 PM IST

१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींना लस दिली जाणार आहे. कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, ही प्रतीक्षा अखेर संपली असून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये लस येऊन पोहचली आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई - कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, ही प्रतीक्षा अखेर संपली असून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये लस येऊन पोहचली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींना लस दिली जाणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीला लसीकरण केंद्रांना डोसचे वाटप

मुंबईत लस कधी येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. आज (बुधवार) पहाटे मुंबईत १ लाख ३९ हजार लसीचे डोस आले असून, हा साठा पहिल्या टप्प्यासाठी पुरेसा असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर आता हा साठा पालिकेच्या परळ येथील कार्यालयात ठेवण्यात आला असून याचे वाटप १६ जानेवारीला सकाळी करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यासाठी 'कोविशील्ड' लसीचे १ लाख ११ हजार डोस

देण्यात येणाऱ्या लसीच्या साठ्यातून 60 हजार डोस पुणे शहराला, 15 हजार पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागासाठी 36 हजार लसीचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रसाद यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुणे आणि मुंबई या दोन शहरात झाला होता. त्यामुळे, या दोन शहरात कशाप्रकारे लसीकरण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोविड लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल

कोविड-१९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ४.३० वाजता जिल्ह्यात दाखल झाला. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. विशेष वाहनाने ही लस ठाणे येथे आणण्यात आली असून, उपसंचालक कार्यालय, मुंबई मंडळ, ठाणे येथे हा साठा पोहोचविण्यात आला आहे.

ठाणे

नाशिक जिल्ह्यात पोहोचली कोविड लस

बहुप्रतिक्षित सिरमची कोविड लस आज पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मध्ये दाखल झाली असून 8 बॉक्समध्ये एकूण लसीचे 1 लाख 32 हजार डोस आहे. ही लस रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या नंतर लसीचे नाशिक जिल्ह्यासह नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आदी ठिकाणी वितरीत करण्यात आले. 16 जानेवारी पासून कोरोना काळात फ्रंट लाईनं कांम केलेल्या नाशिक जिल्ह्यातील 30 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

नाशिक

रायगडमध्ये आज रात्री उशिरा दाखल होणार कोविशिल्ड लस

रायगड जिल्ह्यातही कोविशिल्ड लस आज रात्री उशिरापर्यंत दाखल होत आहे. 9 हजार 700 लस ही ठाणे येथून वाहनाने रायगडात दाखल होणार आहे. पहिल्या टप्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना लसीचे लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 16 जानेवारीपासून जिल्ह्यात प्रत्यक्षात लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.