ETV Bharat / state

Corona Vaccination Review : कोरोना महामारीला दोन वर्ष पूर्ण ; राज्यातील लसीकरणाचा आढावा

author img

By

Published : Jan 6, 2023, 9:51 AM IST

Updated : Jan 6, 2023, 10:27 AM IST

जानेवारी 2020 पासून कोरोना महामारीला (Covid Epidemic India) संपूर्ण देश सामोरा जात आहे. गुरूवारपर्यंत भारतात एकूण 220 कोटी 11 लाख 71 हजार 934 लसीच्या मात्रा म्हणजेच डोस दिले गेलेले (Corona Vaccination Review) आहेत. अजून चौथी लाट येण्याची भिती आहे. अद्यापही वय 60 च्या पेक्षा अधिक जनसंख्यासाठी तीव्र गतीने लसीकरण करण्याची गरज आहे, असे तज्ञ डॉ. अविनाश भोंडवे, यांनी सांगितले (Maharashtra Corona Update) आहे.

corona  vaccination review
कोरोना लसीकरण आढावा
प्रतिक्रिया देताना डॉ अविनाश भोंडवे

मुंबई : दोन वर्षांपूर्वी जानेवारी 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे देश एका संकटात अडकला (Corona Vaccination Review) होता. पहिले वर्षभर नवीन औषधे आणि लसीचा शोध सुरू झाला. त्याकाळात भारत सरकारने पुढाकार घेऊन सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत-बायोटिक या दोघा वैद्यकीय कंपन्यांनी महत्त्वाचे कोरोना महामारीवर लस निर्माण केली. 16 जानेवारी 2021पासून लसीकरणाची सुरुवात देशभर केली गेली. सुरुवातीला हे लसीकरण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अग्रदल म्हणून डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचारी व पोलीस यांना दिले गेले. त्यानंतर शासनाने साठीच्या पुढील वयोगटासाठी लसीकरण खुले केले. त्याचबरोबर 45 ते 60 वयोगट तसेच 18 ते 45 या वयोगटाला टप्प्याटप्प्याने इतर वयोगटातील व्यक्तींना देखील लस मात्रा दिली (Covid Epidemic India) गेली.

Corona Vaccination Review
भारत कोरोना अपडेट

भारतातील लसीकरणाची स्थिती : कालपर्यंन्त एकूण भारतात 220 कोटी 11 लाख 71 हजार 934 लसीच्या मात्रा म्हणजेच डोस दिले गेलेले आहेत. भारतामध्ये दोन अब्जापेक्षा जास्त डोस नागरिकांना दिले गेलेले आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या देशांमध्ये इतक्या प्रमाणात लसीकरण होणे हा एक उच्चांक आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा जरा अधिक आहे. त्याच्या तुलनेमध्ये प्रत्येकाला दोन डोस याप्रमाणे 260 कोटी डोस दिले गेले पाहिजे. त्याच्यामुळे अजूनही बऱ्याच नागरिकांनी डोस घेतलेले नाहीत. हे या ताज्या आकडेवारीमधून स्पष्टपणे दिसून येते. देशामध्ये 18 वयापेक्षा पुढील वयोगटामधील 92 कोटी व्यक्तींना पहिला डोस दिला गेला आहे. दुसरा डोस 86 कोटी 51 लाख व्यक्तींना दिला गेला (India Corona Update) आहे.

लसीकरण मात्रा : पंधरा ते अठरा फक्त याच वयोगटातील 6 कोटी व्यक्तींना तर दुसरा डोस 5 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींना कोविड प्रतिबंधात लसीची मात्रा दिली गेली होती. तर बारा ते चौदा या वयोगटातील चार कोटी व्यक्तींना लसीची मात्रा दिली गेली होती. दुसरा डोस 3 कोटी 25 लाख बालकांना लसीचे मात्रा दिली गेली आहे. देशात तिसरा डोस घेतलेल्या एकूण व्यक्ती 18 कोटी 45 लाख इतके आहेत. त्यात 15 ते 59 या दरम्यान आहे. 60 या पुढील वयोगटातील सहा कोटी 96 लाख वृद्धांना लसीकरण दिले गेलेले (Maharashtra Corona Update) आहेत.

राज्याबाबत लसीकरण स्थिती : महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12 कोटीपेक्षा अधिक आहे. एकूण राज्यांमधील सर्व लसीकरणाची संख्या 17 कोटी 77 लाख 21हजार इतकी आहे. राज्यातील लोकसंख्या पाहता अपेक्षित टप्पा अजून वेगाने गाठायला हवा. प्रथम लसीच्या मात्रा घेतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या राज्यात 8 कोटी 46 लाख 46 हजार 939 तर दुसऱ्या लसीची मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या 7 कोटी 15 लाख 99 हजार 292 आहे. राज्यातील पहिली लस घेतली, अश्या वयोगट 15 ते 18 मधील व्यक्ती संख्या 41 लाख 14 हजार 997 आहे. तर दुसरी लस घेतलेले वय 15 ते 18 वयोगटातील एकूण व्यक्ती संख्या आहे. 30 लाख 99 हजार 586 इतकी आहे. वयोगट 12 ते 14 मधील पहिली लस घेतलेल्या बालकांची संख्या 28 लाख 90 हजार 111 इतकी आहे. वय वर्ष 12 ते 14 वयोगटातील बालकांना दुसरी लस दिली. अशा बालकांची संख्या 18 लाख 68 हजार 652 इतकी आहे. राज्यामध्ये एकूण खबरदारीचा ज्याला बूस्टर डोस म्हणतो किंवा वर्धक लसीची मात्रा घेतलेल्या प्रौढ 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींची संख्या 50 लाख 46 हजार 917 (Corona Vaccination) आहे.

शासनास आणि जनतेस आवाहन : चीनमध्ये 40 ते 60 आणि साठ वयापेक्षा ज्यांचे वय अधिक आहे, अशा व्यक्ती रुग्णालयात जास्त संख्येने भरती होत आहेत. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे हे सांगतात, याचे कारण तिथे या वयोगटाचे लसीकरण पूर्णतः झालेले नाही. भारतामध्ये बऱ्यापैकी लसीकरण झालेले आहे. अद्याप चौथी लाटेची भीती आहे. मात्र आपल्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही. भारतात देखील वय 60 च्या पेक्षा अधिक जनसंख्यासाठी तीव्र गतीने लसीकरण करण्याची गरज आहे. हे सांगण्याचे कारण असे की, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. त्यांना कोरोना महामारीचा विषाणूमुळे गंभीर त्रास होणार (Corona Vaccination In India) नाही.

स्वईच्छेने मास्क गरजेचे : अतिदक्षता विभागांमध्ये दाखल करण्याची गरज राहणार नाही. मात्र ज्यांना सहव्याधी आहेत. ज्यांना पूर्वीपासूनच मधुमेह कर्करोग इतर गंभीर आजार आहे, त्यांना मात्र गंभीर त्रास होऊ शकतो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी शक्यतो स्वईच्छेने मास्क लावून जायला हवे. तसेच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने याबाबत ठोस पावले उचलली पाहिजे. ज्यांचे वय 60 आणि त्यापेक्षा पुढे आहे त्यांनी एकही डोस घेतलेल्या नाही. किंवा एकच लशीची मात्रा घेतलेली आहे. त्यांना सर्व लसीच्या मात्रा आणि वर्धक मात्रा त्वरित दिल्या जातील हे, काळजीपूर्वक पहावे लागणार आहे. तसेच जनतेने देखील याबाबत खबरदारी घेत ज्यांनी लसीची दुसरी मात्रा आणि खबरदारीची मात्रा घेतली नसेल त्यांनी त्वरित घ्यावी, म्हणजे कदाचित त्यांना विषाणूने ग्रासले तर त्यांना गंभीर त्रास होणार नाही.

Last Updated : Jan 6, 2023, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.