मुंबई - राज्यात आज बुधवारी 960 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
9 हजार 366 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 960 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 32 हजार 257 वर पोहोचला आहे. तर आज 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 807 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 78 हजार 422 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.21 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 84 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 9 हजार 366 सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833, 21 नोव्हेंबरला 845, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 24 नोव्हेंबरला 960 रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू संख्येत चढ उतार -
तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18 नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15, 20 नोव्हेंबरला 15, 21 नोव्हेंबरला 17, 22 नोव्हेंबरला 8, 23 नोव्हेंबरला 19, 24 नोव्हेंबरला 41 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 251
अहमदनगर - 77
पुणे - 114
पुणे पालिका - 97
पिंपरी चिंचवड पालिका - 67
हे ही वाचा - राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ई़डीचे समन्स; 26 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश