ETV Bharat / state

'कोरोना आऊटब्रेक: स्टडी फ्रॉम होम'च्या माध्यमातून कोरोनावर होणार संशोधन!

author img

By

Published : May 7, 2020, 9:16 AM IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपूरच्या सहकार्याने 'कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम' हा उपक्रम शासनाने विकसित केला आहे. या उपक्रमाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे संशोधन पाठवण्यास सांगितले आहे. एकत्रित करण्यात येणाऱ्या या माहितीचा कोरोनाशी लढण्यासाठी उपयोग होणार आहे.

Corona Research
कोरोना संशोधन

मुंबई - कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. या परिस्थितीत लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. देशातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधन करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भातील हे संशोधन सर्वांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केला आहे.

नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपूरच्या सहकार्याने 'कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम' हा उपक्रम शासनाने विकसित केला आहे. या उपक्रमाच्या संकेत स्थळावर यावर सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे संशोधन पाठवण्यास सांगितले आहे. एकत्रित करण्यात येणाऱ्या या माहितीचा कोरोनाशी लढण्यासाठी उपयोग होणार आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आयआयटी खरगपूरने सुरू केलेल्या 'कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम' या प्लॅटफॉर्मवर कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरी म्हणजेच विशेष संग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयामध्ये देशविदेशातील तज्ज्ञाची प्रकाशने, अहवाल, व्हिडिओ, जर्नल्स, कॉन्फरन्स आणि आयडिया कॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यक्तीला आपले संशोधन या प्लॅटफॉर्मसाठी देता येणार आहे. प्राचार्यांनी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कर्मचारी यांनी केलेले संशोधन संस्थेच्या मेल, संकेतस्थळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरीकडे पाठवण्याची विनंती मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.