ETV Bharat / state

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर

corona update
corona update
author img

By

Published : Jun 15, 2021, 6:31 AM IST

Updated : Jun 16, 2021, 10:18 AM IST

22:27 June 15

भिवंडीत म्यूकरमायकोसिसचा पहिला बळी; काळ्या बुरशीने महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

ठाणे - भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले तरी म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले असून भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिस आजाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याचाच म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झाल्याने मनपा कर्मचाऱ्यांसह, परिवार व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भिवंडीत म्युकरमायकोसिस आजाराचा हा पहिलाच बळी असल्याचे समोर आले आहे. भिवंडी मनपा म्युकरमायकोसिस आजाराबाबत आता तरी खबरदारी घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. दिपीका दिनेश घाडगे (वय ४४ वर्ष) असे म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या भिवंडी महापालिकेत प्रभाग पाचमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. 

21:02 June 15

मुंबईत ५०० लसीकरण केंद्र सुरु होणार, लसीसाठी कंपन्यांसोबत बोलणी सुरु

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले पाच महिने लसीकरण सुरु आहे. केंद्र सरकराने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी महापालिकेकडून ५०० लसीकरण केंद्र सज्ज आहेत. तसेच मुंबई महापालिकेला लस मिळावी म्हणून लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरु आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

21:02 June 15

नागरिकांसाठी पॅसेंजर ट्रेन सुरू करा; प्रवाशांची मागणी

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लाॅकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या गाड्यांमुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा जादा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे राज्यातील पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे. तसेच आता मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दुरातों एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.  

21:02 June 15

मुंबईत आज 575 नवे रुग्ण, १४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत आज 575 नवे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीनंतर गेल्या चार महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 702 दिवसांवर पोहचला आहे. 

19:48 June 15

मुंबईतील लोकल सुरु करण्याचा निर्णय एमएमआर क्षेत्रातील रुग्णसंख्येवर अवलंबून, गुरुवारी मुंबईचा आढावा

गुरुवारी मुंबईतील रुग्णसंख्येचा आढावा आढावा

मुंबई - राज्य सरकारने राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. मुंबईत निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी प्रवासासाठी सामान्य नागरिकांना लोकल अद्याप बंद आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णसंख्या किती आहे याचा विचार केला जात आहे. येत्या गुरुवारी मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यानंतर राज्य सरकार लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय घेणार घेईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

19:03 June 15

धारावी सलग दुसऱ्या दिवशी शून्यावर, वर्षभरात आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद

मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्या वर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. मात्र याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोमवारी शून्य रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा दुसऱ्या दिवशी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सलग दोन दिवस धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात धारावीमध्ये आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. 

18:29 June 15

बारामतीतील दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक..

बारामती - बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये कोरोना विषाणू संक्रमीत रूग्ण आढळून येत आहेत. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या आस्थापनातील सर्व मालक, विक्रेते (सेल्समन), इतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर टेस्ट रिपोर्ट जवळ ठेवण्यात यावा. ॲन्टीजेन टेस्ट केलेली असली तरी आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. सदरची तपासणी पंधरा दिवसांकरिता ग्राह्य असल्याने दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी. 

16:59 June 15

कोव्हॅक्सिन १५० रुपयात देणे परवडत नाही - भारत बायोटेक

नवी दिल्ली - कोव्हॅक्सिनकडून सरकारला लशीचा प्रति डोस हा १५० रुपयांना देण्यात येत आहे. ही किंमत स्पर्धात्मक नाही. तसेच फार काळ टिकणारे नाही. त्यामुळे उत्पादनाचा खर्च अधिक असल्याने खासगी क्षेत्राकरिता लशीचा दर अधिक हवा, असे भारत बायोटेकने म्हटले आहे.कोव्हॅक्सिन ही खासगी क्षेत्रासाठी महाग का आहे, त्यावर भारत बायोटेक कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. खासगी क्षेत्राकडून होणारी कमी खरेदी, वितरणाचा खर्ज, किरकोळ विक्रीतील नफा आदी कारणांनी ही लस महाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

16:11 June 15

104 वर्षांच्या वृध्दाची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

104 वर्षांच्या वृध्दाची कोरोनावर मात

कराड (सातारा) - कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये 10 दिवस उपचार घेऊन रघुनाथ जाधव (रा. इंदोली, ता. कराड) या 104 वर्षांच्या वृध्दाने कोरोनावर मात केली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.    

16:11 June 15

मुंबई महापालिकेचे कोविडवर माहितीपुस्तिका, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई - कोविड आजार व त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि निगडित अनुभव या विषयावर मुंबई महापालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक माहितीची नवीन मार्गदर्शिका आहे. या पुस्तकाच्या वजना बरोबर यातील माहितीही तोलामोलाची आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.  कोविड आजार व त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि निगडित अनुभव" या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.  

15:21 June 15

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच ऑलम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना लसीकरणात प्राधान्य

मुंबई - परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच ऑलम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. दोन डोसमध्ये 84 दिवसांचा कालावधी कमी करून 28 दिवसाने लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे. मुंबई महापालिकेने हे परिपत्रक जारी केले आहे. 

13:07 June 15

'केंद्राने राज्याला लसींसाठी झुकते माप द्यावे' - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे -  राज्यातील कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन तीन जिल्हे सोडले तर पॉझिटिव्ह रेट कमी होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

10:35 June 15

देशात एम्सच्या डॉक्टरांचे कोव्हीड विरोधात बूस्टर डोसवर संशोधन सुरू

नवी दिल्ली - कोरोनाच्या लसींची अधिक कार्यक्षमता टिकविण्यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का हे पाहण्यासाठी भारत, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे.

09:11 June 15

नागपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर 0.4 वर, 30 नवीन बाधितांची नोंद

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील एप्रिल महिन्यात प्रचंड वाढलेला कोरोना बधितांचा आकडा आता घटला आहे. पहिल्या लाटेनंतर निच्चांक आकडा म्हणून 30 जण कोरोनाबाधित झाल्याचे सोमवारी आलेल्या अहवालात दिसून आले. यात शहरात 18 तर ग्रामीण मध्ये 10 जण आढळून आले आहेत. यासोबत पॉझिटिव्हीटी दर खालावत 0.4 वर आलेला आहे.

06:17 June 15

राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर कोल्हापूरचा तर गोंदियाचा दर सर्वात कमी

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. राज्यातील पॉझिटीव्हीटी रेट किती आहे, यावर ही आखणी करण्यात आली आहे . राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली असून यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक १५. ८५ एवढा दर्शवण्यात आला आहे . कोल्हापूरपाठोपाठ रत्नागिरी - १४. २ , रायगड १३. ३ आणि पुण्याचा पॉझिटीव्हीटी रेट ११. ११ दर्शवण्यात आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट गोंदिया जिल्ह्याचा ०.८७ टक्के आहे.

06:07 June 15

Mumbai Corona : धारावी दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर वर्षभरात सातव्यांदा रुग्णसंख्या शून्यावर

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले त्यावेळी धारावीतही रुग्ण वाढू लागले होते. धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. काल तर धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा तर गेल्या वर्षभरात धारावीत सातव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Jun 16, 2021, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.