ETV Bharat / state

गर्भवतींनो सावधान..! कोरोनाबरोबर होऊ शकतो डेंंग्यू अन् मलेरियाही - कोरोनाग्रस्त गर्भवती महिला न्यूज

ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशांना लवकर कोरोना होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांनाही कोरोना होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, याच महिलांना आता कोरोनासोबत डेंंग्यू व मलेरियाही होत असल्याचे समोर आले आहे.

pregnant
गर्भवती
author img

By

Published : Oct 10, 2020, 4:34 PM IST

मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांना असून त्या पाठोपाठ गर्भवतींचा क्रमांक लागतो. कोरोनाग्रस्त गर्भवतींवर मुंबईत योग्य उपचार होत असून त्या बऱ्या होऊन घरी जात आहेत. हे खरे असले तरी गर्भवतींना कोरोनाची लागण होऊच, नये यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंबासह डॉक्टरांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण गर्भवतींना कोरोनाबरोबरच डेंग्यू आणि मलेरियाचीही लागण होत असून त्यात त्यांची प्रकृती खालवत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिपरोडेक्टिव्ह हेल्थ-NIRRH) च्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

त्यानुसार आता एनआयआरआरएचने कोरोनाग्रस्त गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाल्यास त्यांची मलेरिया आणि डेंग्यू चाचणी करावी, अशा सूचना डॉक्टर व रुग्णालयांना केल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात, असे सहा रुग्ण आढळल्याचेही एनआयआरआरएचने आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.

कोरोनाग्रस्त गर्भवतींवर वेळेत आणि योग्य उपचार देणे गरजेचे होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेत नायरमध्ये त्यांच्यासाठी विशेष कक्ष तयार केला. तर, सायन आणि केईएममध्येही गर्भवती कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. शेकडो कोरोनाग्रस्त गर्भवती महिला कोरोनावर मातकरून प्रसूती होऊन सुरक्षित घरी गेल्या आहेत. ही सकारात्मक बाब असली तरी गर्भवतींची विशेष काळजी सध्याच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगतात. त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती अधिक असून त्यामुळे बाळंतपणात अडचणी येण्याची शक्यता असते. कोरोनाग्रस्त मातेच्या नाळेतून पोटातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होत असल्याची, गर्भपात होत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत.

आता कोरोनाग्रस्त गर्भवतींची काळजी वाढवणारी बाब एनआयआरआरएचच्या अभ्यासातून समोर आली आहे. कोरोनामध्ये ताप येतो, दम लागतो, सर्दी होतो. ही लक्षणे पाहता येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करत त्यांच्यावर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही ताप किंवा इतर लक्षणे कायम राहत असल्याचे दिसून येत आहे. नायरमधील अशाच सहा रुग्णांमधील लक्षणे उपचारांनंतर ही कायम असल्याने त्यांची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी करण्यात आली. तेव्हा काहींना कोरोनाबरोबर मलेरिया तर काहींना डेंग्यूही झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मलेरिया-डेंग्यूचे उपचार करण्यात आले. वेळेत निदान झाल्याने आणि उपचार मिळाल्याने या रुग्णांचा आजार बळावला नसल्याची माहिती एनआयआरआरएचचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक मोदी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले, निदान झाले. पण जर निदान आणि उपचारांना विलंब झाला असता तर रुग्णासह पोटातील बाळालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉ. मोदी यांनी सांगितले. या अनुषंगाने आता सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी आपल्याकडे येणाऱ्या गर्भवती रुग्णांची कोरोना चाचणी तसेच मलेरिया-डेंग्यू चाचणीही करावी, अशा सूचना एनआयआरआरएचने दिल्या आहेत. कोरोना आणि मलेरिया-डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने कोरोनाचीच चाचणी व उपचार होतात. पण कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने मलेरिया-डेंग्यूही होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता मलेरिया-डेंग्यूची चाचणी आवश्यक आहे, असे डॉ. मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.