ETV Bharat / state

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक - पुन्हा कोरोना संख्या वाढू लागली

मुंबई, पुणे ठाण्यासह नागपूर, अमरावतीमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. विदर्भातील ११ पैकी पाच जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने शाळा-महाविद्यालये बंद केली असून चार जिल्ह्यांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 18, 2021, 6:40 PM IST

Updated : Feb 19, 2021, 12:52 PM IST

मुंबई - कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कमी होत असल्याने दिलासादायक स्थिती होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. मुंबई, पुणे ठाण्यासह नागपूर, अमरावतीमध्ये बुधवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. विदर्भातील ११ पैकी पाच जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने शाळा-महाविद्यालये बंद केली असून चार जिल्ह्यांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईतील काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी भाग कोरोनाचे नवे 'हॉटस्पॉट' म्हणून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या काही सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. टाळेबंदीमध्ये शिथीलता दिल्यावर नागरिकांकडून मास्कचा, सॅनिटायझरचा वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन न करणे, रेल्वेमधून प्रवास करताना मास्कचा वापर न करणे अशा कारणांमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

टाळेबंदीबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे टाळेबंदी तसेच कोरोनासंदर्भाचे नियम कडक करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बैठक झाली. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोला, यवतमाळ आणि अमरावती हे तीन जिल्हे तसेच राज्यातील इतर ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील आढावा घेताना आमचे प्रतिनिधी

मुंबईतील या भागांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या -

मुंबईतील बोरीवली आर सेंट्रल भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती २२ हजार ४९४ पर्यंत पोहचली आहे. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम के वेस्ट या विभागात कोरोना रुग्ण संख्या २० हजार ८९१ वर पोहचली आहे. कांदिवली, चारकोप या आर साऊथ या विभागात १९ हजार ०६७ कोरोना रुग्ण आहेत. मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ या पी नॉर्थ या विभागात एकूण १८ हजार ९५४ कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी पूर्व के ईस्ट या विभागात एकूण १८ हजार ६९६ रुग्ण आहेत. मुलुंडच्या टी विभागात एकूण १६ हजार १८२ रुग्ण आहेत.

सातारा

अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये स्थिती बिकट

मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शहरांमध्ये परिस्थिती बिकट होत चालली असून काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दरवाढीत राज्यात वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सायंकाळी ७ नंतर बाजारपेठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आतापासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बुधवारी १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुणे

अमरावती जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्युचे आदेश

अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आज सकाळपासून अमरावतीसह यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी लावली जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. मात्र, आता रविवारी केवळ एका दिवसासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात जनता कर्फ्युचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. जनता कर्फ्युमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत दररोज 200 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने कोरोना नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कारवाईसाठी विशेष पथक पुन्हा एकदा कार्यान्वित केले आहे. हे विशेष पथक मंगल कार्यालय, मॉल्स, लॉन्स, सभागृह, खुले मैदान, चौक या ठिकाणी नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करणार आहे. या पथकामध्ये म.न.पा आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश केला आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर थेट फौजदारी कारवाईसुद्धा केली जाणार आहे.

बुलडाण्यातही संचारबंदीचे आदेश-

जिल्ह्यात सर्वाधिक 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहता आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Feb 19, 2021, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.