मुंबई - मुंबईत कोरोना चाचण्या कमी केल्याने रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. आज चाचण्यांची संख्या वाढताच रुग्णसंख्येत वाढ होऊन १३२ नव्या रुग्णांची ( 132 new corona patient in mumbai ) तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १५० हुन अधिक वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ५६१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे १३२ नवे रुग्ण - मुंबईत २९ ऑक्टोबरला ४९९४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३२ रुग्णांची नोंद झाली. शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५३ हजार ८६० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३३ हजार ५६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५६१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९८०३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००७ टक्के इतका झाला आहे.
रुग्णसंख्येत चढउतार - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यानसलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे.
ऑक्टोबर महिन्यात रूग्णवाढ - दिवाळीच्या सणानिमित्त व हिवाळ्याची सुरूवात ही ऑक्टोबर मध्ये सुरू झाल्याने ही रूग्णवाढ आता वाढायला लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून ते ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत नव्याने रूग्णवाढ झालेली संख्या 132 झाली आहे.
एकूण १५२ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १५२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात २२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.