मुंबई - कोरोनामुळे हॉटेल क्षेत्राचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. गेल्या चौदा ते पंधरा महिन्यात या क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नसल्यामुळे मुंबईतील हयात रेजन्सी या पंचतारांकित हॉटेलने आपला कारभार काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील या हॉटेलने आपला सर्व कारभार तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा हॉटेल व्यवस्थापनाने केली आहे.
कोरोनाचा असाही फटका
आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे हॉटेलची मालकी असणाऱ्या कंपनीने सांगितले आहे. मुंबईतील मुख्य ठिकाणी या हॉटेलची जागा होती. या ठिकाणाची सर्व व्यवस्था थांबवली असल्याचे हयार रेजन्सीने सांगितले आहे. कंपन्यांकडे देशभरातील मुख्य शहरांमध्ये पंचारांकित हॉटेल चालवणाऱ्या कंपन्यांची मालकी आहे. सहारा विमानतळ जवळ हे हॉटेल आहे. मुंबईतला हॉटेल काही काळासाठी बंद केले असले तरी दिल्लीतील हॉटेल सुरू राहणार असल्याचा हॉटेल व्यवस्थापन सांगितले आहे. कोरोनाचा फटका हा सर्व क्षेत्राला बसला आहे, हॉटेल क्षेत्राला प्रमुख मोठा फटका बसला आहे. कारण पर्यटनात नसल्यामुळे हॉटेलमध्ये कोणीही येत नव्हते. यामुळे हॉटेलला मोठे नुकसान झाले. देशातील सर्वच हॉटेल क्षेत्राची हीच परिस्थिती आहे. कमी झालेली पर्यटक संख्या या गोष्टींमुळे कंपनीसमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी एशियन हॉटेल्सकडे आहे. या कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे हयात रेजन्सीचा सर्व कारभार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे हॉटेल बंद राहणार असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री गंभीर - संजय राऊत