मुंबई - कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी परिसराचे काल मुंबई महानगरपालिकेने निर्जंतुकीकरण केले. मिशन धारावीच्या 90 फिट रोडवर महापालिकेच्या ट्रॅक्टरने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. धारावी हॉटस्पॉट घोषित झाल्यावर महानगरपालिकेने येथे युद्ध स्तरावर आपले कार्य सुरू केले. धारावीवासियांच्या कोरोना परीक्षणापासून परिसराच्या कानाकोपऱ्यात निर्जंतुकरण करण्यापर्यंत विविध उपाययोजना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.
![मुंबई महापालिकेचे मिशन सॅनिटायझेशन.....](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-2-1742020-dharavi-sanitization-7209217_17042020211543_1704f_1587138343_216.jpg)
![मुंबई महापालिकेचे मिशन सॅनिटायझेशन.....](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-2-1742020-dharavi-sanitization-7209217_17042020211543_1704f_1587138343_354.jpg)