ETV Bharat / state

कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचारांचा खर्च

author img

By

Published : Mar 10, 2021, 7:34 PM IST

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाली आहे, अशा एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता वैद्यकीय उपचारांचा खर्च मिळणार आहे.  2 सप्टेंबर 2020 पासून वैद्यकीय उपचारांसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Corona affected ST employees news
कोरोनाबाधित एसटी कर्मचारी न्यूज

मुंबई - एसटी महामंडळातील कर्मचारी कोरोना काळात आपल्या कुटुंबीयांची आणि जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करत होते. यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळे अशा एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराचा खर्च देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 चा समावेश

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाली आहे, अशा एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता वैद्यकीय उपचारांचा खर्च मिळणार आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून वैद्यकीय उपचारांसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आजारांच्या उपचारांसाठी होणाऱ्या या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. अशा विविध 27 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.

शासनाकडून मान्यता

शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य परिवहन महामंडळासाठीही लागू करण्यात आलेले आहे. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना कोविडचा संसर्ग होऊन, आजारी पडल्यास त्यासाठी होणारा वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाकडून देण्यात येणार आहे. हा निर्णय 2 सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. यासंदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाने महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.