ETV Bharat / state

वाहन दुरुस्ती व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका; मजूरवर्ग उपासमारीच्या उंबरठ्यावर - pune

देशातील लॉकडाऊन जरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी फलदायी ठरत असले. मात्र, व्यवसायावर त्याचे विपरित परिणाम पहायला मिळत आहे. वाहन व्यवसायाबरोबरच अत्यावश्यक सेवेतून वगळलेल्या इतर उद्योगातील लाखो कर्मचारी, मजूरवर्ग बेरोजगारीमुळे उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.

lockdown effect pune
वाहन दुरुस्ती व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका
author img

By

Published : Apr 13, 2020, 2:55 PM IST

मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाला लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशात लॉकडाऊन घोषित केले होते. नागरिकांनी घरीच रहावे, असे त्यामागचे उद्देश्य होते. यामुळे थोडे का होईन कोरोनाचे संक्रमण कमी होण्यात यश येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायाला खीळ लागल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यात वाहन दुरुस्ती व्यवसायाला कोरोनाची नजर लागली आहे. कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी आणि चारचाकी दुरुस्त करणारे सर्व मेकॅनिक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने वाहन दुरुस्ती कामगारांना पगार देणे अवघड झाले आहे. त्यामुळे, कामगारांपुढे जगावे कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, लॉकडाऊन संपल्यावर देखील लवकर काम सुरू होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, आपल्यावर उपासमारीची वेळ तर येणार नाही ना, ही चिंता कामगारांना सतावत आहे.

तसेच, लॉकडाऊन दरम्यान अनेक वाहने अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करत आहे. प्रवासा दरम्यान ही वाहने तांत्रिक बिघाड होऊन बंद पडल्यास त्यांची दुरुस्ती कशी होणार, हा देखील प्रश्न आहे. या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास अत्यावश्यक वस्तू पुरवाठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, संचारबंदी असल्याने अनेकांची वाहने घरीच पडून आहेत. ही वाहने बऱ्याच दिवसापासून घरीच असल्याने त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता नकारता येत नाही, असे मत एका मोटार दुरुस्ती कामगाराने व्यक्त केले आहे.

कोल्हापुरातील ३ हजार वाहन दुरुस्ती अस्थापनांना कोरोनाचा फटका

जिल्ह्यात वाहन दुरुस्ती दुकांनांची संख्या हजाराच्या घरात आहे. एकट्या कोल्हापूर शहरात ३ हजार वाहन दुरुस्ती दुकाने आहेत. या दुकानांना लॉकडाऊमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व मालवाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील जवळपास दीड हजार ट्रक अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. पण, वाहनामध्ये अचानक बिघाड आल्यास चालकांना मेकॅनिक शोधण्यात वेळ घालवावा लागत असल्याची माहिती लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षांकडून मिळाली आहे. त्यामुळे, मेकॅनिक नसल्याचा फटका फक्त घरगुती वाहनांनाच बसत नसून अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना देखील बसत असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यातील वाहन दुरुस्ती व्यवस्था कोलमडली

लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील वाहन दुरुस्ती व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला असून मालक-कामगार दोघांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुणे आणि मुंबई शहर हे आघाडीवर आहेत. पुण्याला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे, भविष्यातही वाहन दुरुस्ती व्यवसायाला उभारी मिळेल असे होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, दुकाने जरी बंद असली तरी अत्यावश्यक सेवेत रुजू असलेल्या नागरिकांच्या मदतीला शहरातील गॅरेज चालक संघटना पुढे आली आहे.

गेल्या काही दिवसात संघटनेतर्फे अत्यावश्यक सेवेत असलेले सुमारे ५० ते ६० नागरिकांच्या दुचाकी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक जबाबदारीचे भाण ठेवत संघटनेतर्फे वाहन दुरुस्तीचे काम मोफत केले जात आहे. दुचाकीत बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी ९८२३०५५६६५, ९४२२५६२२४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष हरीश अंघोळकर यांनी केले आहे.

एकंदरीत देशातील लॉकडाऊन जरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी फलदायी ठरत असले. मात्र, व्यवसायावर त्याचे विपरित परिणाम पहायला मिळत आहे. वाहन व्यवसायाबरोबरच अत्यावश्यक सेवेतून वगळलेल्या इतर उद्योगातील लाखो कर्मचारी, मजूरवर्ग बेरोजगारीमुळे उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनापासून लॉकडाऊन तारणार, मात्र हाती काम नसल्याने उपासमारी मारणार की काय, ही चिंता वाहन दुरुस्ती व्यवसाय व तत्सम इतर व्यवसायातील नागरिकांना सतावत आहे.

हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती; स्वस्तात होणार उपलब्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.