नवी मुंबई - नवी मुंबई सीवूड्स मधील वादग्रस्त बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या ( Bethel Gospel Church ) चर्चवर नवी मुंबई महानगर पालिका, सिडकोने संयुक्तरित्या हातोडा चालवला ( Bethel Gospel Church demolish ) आहे. आश्रमात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याच्यार करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य समोर आल्यानंतरही सरकारी जागेवर चर्चमधील अवैध आश्रम दिमाखात उभे होते. भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( State President of BJP Mahila Morcha Chitra Wagh ) यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट ( Chitra Wagh met Rajesh Narvekar ) घेत या वादग्रस्त तसेच अनधिकृत चर्चवर होत नसलेल्या कारवाईबाबत जाब विचारला तसेच कारवाईची मागणी केली होती.
चर्च जमीनदोस्त - त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात म्हणजे आज सकाळीच चर्च जमीनदोस्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने कारवाई केली हाती. या चर्चमधील अल्पवयीन 45 मुलांची सुटका बाल विकास विभागाने केली होती. यामध्ये 13 मुलींचा समावेश होता. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता यातील तीन मुलींचे शोषण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनआरआय पोलीस ठाण्यात चर्च विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये लहान मुले, मतीमंद महिला असून तेथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती ठाणे महिला बाल विकास विभागाला मिळाली होती.
तीन मुलींवर लैंगिक अत्याचार - माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 45 मुलांची सुटका केली होती. या सर्वांना उल्हासनगरमधील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या 12 ते 14 वयोगटातील तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. मुलींच्या अंगाला विक्स, तेल लावणे, त्यांना गुगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात असल्याची माहिती सुटका करण्यात आलेल्या मुलींनी दिली होती.
एका मुलीचा गर्भपात - यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तसेच मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचे प्रकार देखील समोर आले होते. या धक्कादायक घटनेप्रकरणी ठाणे जिल्हा महिला - बाल विकास विभागाने एनआरआय पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून चर्च मधील पास्टर राजकुमारला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दोषींवर कारवाई - यात आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. लकरच या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांमधून आश्रमाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि पालकांमधून होत आहे. गंभीर अशा या प्रकरणानंतरही अनधिकृत चर्चवर तोडक कारवाई होत नसल्याने चित्रा वाघ यांनी जाब विचारल्यानंतर आता हे चर्च जमीनदोस्त करण्यात आले आहे.