ETV Bharat / state

कोरोनावरील आणखी २ लाख ६० हजार लसीचा साठा मुंबईत दाखल

author img

By

Published : Feb 13, 2021, 6:18 AM IST

मुंबईत शुक्रवारी 22 लसीकरण केंद्रांवर 104 बूथवर 4700 आरोग्य कर्मचारी तर 5700 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2382 आरोग्य कर्मचारी तर 3979 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6361 जणांना लस देण्यात आली.

लसीचा साठा मुंबईत दाखल
लसीचा साठा मुंबईत दाखल

मुंबई - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीचा साठा कमी पडू नये म्हणून मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी २ लाख ६० हजार लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिकेला ५ लाख २४ हजार ५०० लस उपलब्ध झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

इतके झाले लसीकरण -

16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. मध्यंतरी कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण स्थगित करण्यात आले होते. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत शुक्रवारी 22 लसीकरण केंद्रांवर 104 बूथवर 4700 आरोग्य कर्मचारी तर 5700 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2382 आरोग्य कर्मचारी तर 3979 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6361 जणांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 7 हजार 725 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

एफ साऊथ वॉर्ड मध्ये लस साठवणूक-

मुंबईसह राज्यभरात लसीकरण मोहीम धडाक्यात सुरू आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने लस तयार केलेल्या लसीचा साठा मुंबई महापालिकेला उपलब्ध होत आहे. शुक्रवारी पहाटे आणखी २ लाख ६० हजार लसीचा साठा उपलब्ध झाला असून आतापर्यंत ५ लाख २४ हजार ५०० लस उपलब्ध झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेच्या परळ येथील पालिकेच्या एफ साऊथ वॉर्डमध्ये या लसीची साठवणूक करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात १ लाख ३९ हजार ५००, दुसऱ्या टप्प्यात १ लाख २५ हजार तर तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी पहाटे २ लाख ६० हजार लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.