ETV Bharat / state

डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापन करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालय - डॉक्टरांवर हल्ला न्यूज

राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ले कोरोना काळातही सुरुच आहेत. हे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी हायकोर्टानं यामध्ये हस्तक्षेप करावा आणि डॉक्टरांच्या संरक्षणाकरिता कायद्यात तरतूद करावी अशी विनंती करत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

उच्च न्यायालय
उच्च न्यायालय
author img

By

Published : Jun 14, 2021, 12:35 PM IST

मुंबई - कोरोनाकाळातही डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीयक्षेत्राशी निगडीत गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर सेल, ईओडब्ल्यू, इ. प्रमाणे स्वतंत्र पोलीस विभाग स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

डॉक्टरांचं संरक्षण करणं अत्यावश्यक
राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ले कोरोना काळातही सुरुच आहेत. हे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी हायकोर्टानं यामध्ये हस्तक्षेप करावा आणि डॉक्टरांच्या संरक्षणाकरिता कायद्यात तरतूद करावी अशी विनंती करत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करताना म्हटलंय की, सध्याच्या कोरोनाकाळात रूग्णांचं रक्षण करणाऱ्या डॉक्टरांचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहे.

स्वतंत्र तपास विभागाची स्थापना
रुग्ण दगावलेल्यांच्या नातेवाईंकाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल करण्यात येतात. त्या तक्रारींचे निवारण आणि त्यांची चौकशी करण्यासाठी सायबर सेल, इओडब्ल्यू, एनसीडब्ल्यू यासारख्या एखाद्या स्वतंत्र तपास विभागाची स्थापना करण्याचा विचार करावा. वैद्यकीय आरोपांविषयी चौकशीसाठी स्वतंत्र विभागाच्या सूचनेबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल, अशी ग्वाही राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींनी हायकोर्टाला दिली. खंडपीठाने पुढील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.