ETV Bharat / state

पवारांशी चर्चा केल्यानंतरच काँग्रेसच्या 'पाठिंब्या'वर होणार निर्णय - शिवसेना-भाजप युती

काँग्रेसच्या या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तरी त्यांना त्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार
author img

By

Published : Nov 11, 2019, 8:58 PM IST

मुंबई - राज्यात काँग्रेसने आज सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंब्याचे जाहीर पत्र न दिल्याने राज्यात नवीन राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच मुंबईत येणार असून त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेसने एक पत्र काढून स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे पत्र
काँग्रेसचे पत्र

काँग्रेसच्या या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तरी त्यांना त्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - सेनेला दिलेली मुदत संपली मात्र; सत्ता स्थापनेचा दावा कायम, काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय नाहीच

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची सकाळी आणि सायंकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यात सेनेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या मित्र पक्षाशी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे एक पत्र काँग्रेसने जारी केले आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श‍िवसेनेत बैठका होऊन त्यातून सर्वसमावेशक असा कार्यक्रम ठरविला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्या सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट घेऊन सेनेच्या पाठिंब्यावर बोलू शकतात, असे ही बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यपालांनी शिवसेनेला पुन्हा मुदत देण्यास नकार दिल्याने तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करू शकतात, असेही बोलले जात आहे.

हेही वाचा - सोनिया गांधींचा शिवसेनेला पाठिंबा देण्याबात आमदारांशी संवाद

Intro:पवारांशी चर्चा केल्यानंतरच काँग्रेसचा 'पाठिंब्या'वर होणार निर्णय
mh-mum-01-cong-ncp-sena-7201153
मुंबई, ता. ११ :
राज्यात काँग्रेसने आज सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंब्याचे जाहीर पत्र न दिल्याने राज्यात नवीन राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच मुंबईत येणार असून त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेसने एक पत्र काढून स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले असून राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला असला तरी त्यांना त्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची सकाळी आणि सायंकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यात सेनेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या मित्र पक्षाशी व राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे एक पत्र काँग्रेसने जारी केले आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श‍िवसेनेत बैठका होऊन त्यातून सर्वसमावेशक असा कार्यक्रम ठरविला जाण्याची शक्यता आहे.
उद्या सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक असून या बैठकीदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट घेऊन सेनेच्या पाठिंब्यावर बोलू शकतात, असे ही बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यपालांनी शिवसेनेला पुन्हा मुदत देण्यास नकार दिल्याने तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करू शकतात असेही बोलले जात आहे.

Body:mh-mum-01-cong-ncp-sena-7201153
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.