ETV Bharat / state

Nana Patole : सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले...

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण विधान (Nana Patole criticized state Goverment) केले.

Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Oct 29, 2022, 11:49 AM IST

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात (security of MVA Leaders) करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण विधान (Nana Patole criticized state Goverment) केले. त्यांनी म्हटले आहे की- महाराष्ट्रामध्ये सगळं काही आलबेल आहे, असे शासनाला वाटत असेल तर स्वागत आहे. मात्र जीवाला काही झाल्यास जबाबदारी शासनाचीच (Reduction in security of MVA Leaders) आहे.

शासनावर टीकेची जोड : राज्यामध्ये टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती बाहेर आली. आणि विरोधी पक्षांनी शासनाला धारेवर धरले. विरोधी पक्षांसह राज्यातील जनतेने देखील शासनावर टीकेची जोड उठवली. फॉक्स्कॉन आणि टाटा एअरबस आणि मल्टी ड्रग्स कंपनी हे उद्योग गुजरातलाच गेले कसे ? या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्व बाजूंनी शासनाला प्रश्न विचारून घायाळ करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी तथा समाजातील विविध बुद्धिवंतांनी केला आहे. त्या राजकीय वादाची किनार म्हणून या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे, अशी सर्वत्र चर्चा (Reduction in security of MVA Leaders) आहे.

सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी पत्र : याच आरोपाच्या दरम्यान शिंदे फडणवीस शासनाने महाराष्ट्र विकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे. या सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याच्या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की - आम्ही सुरुवातीलाच या शासनाकडे पत्र दिले होतो. की आमची सुरक्षा व्यवस्था आपण राखावी. राज्यभरात ठीकठिकाणी दौरे करावे लागतात, सामाजिक राजकीय स्तरावर उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागते. मागे जेव्हा आमचे पुतळे भाजपच्या लोकांनी आंदोलन केले, पुतळे जाळले, त्याच वेळेला ते पत्र दिले होते.

जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची : आता शासनाला महाराष्ट्रामध्ये सगळं अलबेल वाटत आहे. कायदा सुव्यवस्था अत्यंत उत्कृष्ट असं वाटत आहे .आणि त्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेकांच्या सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, तर स्वागत आहे. मात्र यातून राज्य शासनाची सुटका होत नाही. त्याचे कारण असे, की राज्यघटनेनुसार जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी ही अखेर शासनाचीच आहे. त्याच्यामुळे शासन निर्णय घेऊ शकते, पण जबाबदारीपासून शासनाला पळता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.