ETV Bharat / state

Atul Londhe : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार, अतुल लोंढेचे राज्य सरकारवर टीकास्त्र.. - अतुल लोंढेंची राज्यसरकारवर टीका

वेदांता फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn project ) पाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प ( Tata Air Bus Project in gujrat ) सुद्धा गुजरात मध्ये गेल्या कारणाने राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या केले जात आहेत. प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या कारणावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Spokesperson Atul Londhe ) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे सरकार इतिहासातील आतापर्यंत सर्वात दळभद्री सरकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Atul Londhe
गुजरातमध्ये प्रकल्प गेल्यावरून अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
author img

By

Published : Oct 30, 2022, 4:05 PM IST

मुंबई - वेदांता फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn project ) पाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प ( Tata Air Bus Project in gujrat ) सुद्धा गुजरात मध्ये गेल्या कारणाने राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या केले जात आहेत. प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या कारणावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Spokesperson Atul Londhe ) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे सरकार इतिहासातील आतापर्यंत सर्वात दळभद्री सरकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये प्रकल्प गेल्यावरून अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आपल्या ताटातील जेवण दुसऱ्याला द्यायचे का? - राज्य सरकारवर टीका करताना अतुल लोंढे म्हणाले की, महाराष्ट्रातून एकामागून एक सर्व प्रोजेक्ट परराज्यात चालले आहेत. काय कारण आहे? सर्वात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर , पाण्याची उपलब्धता, जमिनीची उपलब्धता, एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. डिफेन्स एवियेशन हब बनवण्याचे, आम्हाला स्वप्न मग कशाला दाखवले होते. वायू सेना, एअर फोर्सचा एमआरओ नागपूरमध्ये अनेक वर्षापासून आहे. तरीसुद्धा या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रावर असहकार्याचा ठपका लागण्याची भीती आहे. आपल्या ताटातील जेवण दुसऱ्याला द्यायचे व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगाराची वेळ आणली. मात्र महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्रात परत आलेच पाहिजेत. आम्ही या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार व या गोष्टींचा निषेध करतो, असेही अतुल लोंढे ( Atul Londhe )म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार - महाराष्ट्र हे इंडस्ट्रिअल स्टेट आहे. जगातील सोळावी इकॉनॉमी असलेले हे राज्य आहे. इथे सर्व काही असताना जर या सर्व गोष्टी होत असतील, तर तुमच्या सरकारला इतिहासातील सर्वात जास्त दळभद्री सरकार म्हणून फक्त घोषित करायचे बाकी आहे. यामुळे माझी आपणाला विनंती आहे की आपण हा प्रोजेक्ट बाहेर जाऊ देऊ नये.

महाराष्ट्रातील कोणते प्रकल्प गुजरातमध्ये - इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर, मुंबई हा प्रकल्प गुजरात मध्ये अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात आला. डायमंड बोर्स, मुंबई हा प्रकल्प गुजरातमधील सुरत येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. मरीन अकॅडमी हा प्रकल्प पालघर मध्ये अपेक्षित असताना तो गुजरात येथील द्वारका येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. वेदांत- फॉक्सकॉन पुण्यामध्ये होणारा हा प्रकल्प गुजरात येथील धोलेरा येथे स्थलांतरित करण्यात आला. वल्क ड्रग पार्क, रायगड येथे होणारा हा प्रकल्प गुजरात येथील भरूच येथे स्थलांतरित करण्यात आला असून सध्या गाजत असलेला टाटा-एअरबस प्रकल्प नागपूर मध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरात मधील वडोदरा येथे स्थलांतरित करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.