मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत हिच्या आई आशा रणौत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. म्हणूनच भाजपाचे लोक कंगनाला झाशीची राणी ही उपमा देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीचे एकूणच कारस्थान भाजपाचेच आहे, हे स्पष्ट झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी ट्विट करून कंगनाच्या आईने केलेल्या भाजपामधील प्रवेशाची माहिती देत तिला भाजपाकडून झाशीची राणी ही उपमा त्यासाठी दिली जात आहे. यामुळेच कंगनाच्या आडून महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान भाजपाचेच आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुंबईला पाकिस्तान म्हणून भाजपाने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आणि त्यासोबतच 106 हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे, असा आरोपही सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
'महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान भाजपाचेच'
मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजपाकडून चांगलेच राजकारण तापवण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर कंगना हिने आपल्या कार्यालयाची तुलना ऐतिहासिक स्थळांसोबत करुन पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे ट्विट केले. त्यातच तिच्या आईकडूनही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दाचा उल्लेख करत टिका केली.