ETV Bharat / state

उत्तर प्रदेशात झालेल्या साधूंच्या हत्येबाबत का बोलत नाही? सावंत यांचा भाजपला सवाल - buldanshahar sadhu mob lynching

पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही भाजपने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. त्या उलट भाजप बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत 'मौन' धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकट काळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याचे सावंत म्हणाले.

buldanshahar sadhu mob lynching  congress spoke person sachin sawant  काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत  बुलंदशहर साधू मॉब लिंचिंग  buldanshahar sadhu mob lynching  बुलंदशहर साधू हत्या प्रकरण
उत्तर प्रदेशात झालेल्या साधूंच्या हत्येबाबत का बोलत नाही? सावंत यांचा भाजपला सवाल
author img

By

Published : Apr 28, 2020, 6:05 PM IST

मुंबई - राज्यातील पालघर इथल्या घटनेत जमावाच्या हल्ल्यात तीन जणांची हत्या झाली, यात दोन साधूही मारले गेले. या घटनेला जातीय रंग देऊन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. आता भाजपशासित उत्तरप्रदेशात दोन साधूंची मंदिरात हत्या झालेली असताना कुणीही काही बोलत नाही, असे खडे बोल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला सुनावले आहेत.

बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून सावंत यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे यावरून दिसून येते. पालघरच्या मॉबलिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर त्याच रात्री महाराष्ट्र पोलिसांनी धरपकड करून ११० आरोपींना ताब्यात घेतले व उच्चस्तरीय चौकशीची घोषणाही केली होती. पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही भाजपने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. त्या उलट भाजप बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत 'मौन' धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकट काळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याचे सावंत म्हणाले.

बुलंदशहर येथील घटनेच्या अनुषंगाने सावंत यांनी भाजपला काही प्रश्नही विचारले आहेत -

  1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पालघरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तत्काळ फोन केला होता. तसाच फोन ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कधी करणार आहेत?
  2. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह एकाही नेत्याने यासंदर्भात निषेधाचा ट्वीट केलेला नाही. ही हत्या निषेधार्ह नाही का?
  3. पालघरचे साधू आणि बुलंदशहरमधील साधूंमध्ये फरक आहे का?
  4. बुलंदशहरातील साधूंचे मारेकऱ्याबरोबर आधी भांडण झाले होते. तरीही त्या साधूंना संरक्षण का देण्यात आले नाही?
  5. साधूंशी भांडण झाल्यानंतर त्या मारेकऱ्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही?
  6. हे उत्तर प्रदेश सरकारचे इंटिलिजन्सचे अपयश आहे का?
  7. भर लॉकडाऊनमध्ये हत्येचे सुनियोजित षडयंत्र आखून तलवारीने साधूंची हत्या होते, उत्तर प्रदेश सरकारचे अपयश नाही का?
  8. या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप करणार आहे का?
  9. पालघरच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागणारे भाजप नेते आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का?
  10. पालघर साधूंच्या हत्येनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी सात्विक आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. काही भाजप नेते तर एक वेळचा अन्नत्यागही करत आहेत. आता बुलंदशहरमधील साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ हे भाजप नेते दुसऱ्याही वेळचे अन्नत्याग करणार आहेत का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.