ETV Bharat / state

MLA Ram Kadam : शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास काँग्रेसला अनुमती द्यावीच लागेल - राम कदम

मंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ( Statue of Shivaji Maharaj in Mangalore ) बसवण्यास काँग्रेसला अनुमती द्यावीच लागेल असे भाजप आमदार राम कदम ( BJP MLA Ram Kadam ) यांनी म्हटले आहे. मंगळुरू येथे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) बसवण्यास काँग्रेसने विरोध केला असल्याची टीका त्यांनी केली ( Ram Kadam criticizes Congress ) आहे.

Ram Kadam
राम कदम
author img

By

Published : Dec 2, 2022, 11:03 PM IST

मुंबई - कर्नाटक, महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाचा वाद ( Karnataka Maharashtra Borderism ) वाढत असताना मंगळुरू येथे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) बसवण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. मंगळुरू सिटी कॉर्पोरेशन ने २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला काँग्रेस ने विरोध दर्शविला आहे. या कारणास्तव भाजप आमदार, प्रवक्ते राम कदम ( BJP MLA Ram Kadam ) यांनी काँग्रेसवर सडकून टीका ( Ram Kadam criticizes Congress ) केली आहे.

राम कदम

काय म्हणाले राम कदम? याविषयी बोलताना राम कदम यांनी म्हटले आहे की, भारत तोडो बोलणाऱ्याबरोबर भारत जोडो ची यात्रा काढून नाटक करणारी काँग्रेस आता मंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याला विरोध करत आहे. एका ठिकाणी तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अभद्र भाषेचा उपयोग करतात. दुसरीकडे हिंदू समाजाची रक्षा करणारे पराक्रमी, साहसी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का करता? शिवाजी महाराज फक्त देशाचे नाही तर, संपूर्ण जगाचे पराक्रमी, साहसी राजे होते आहेत. आमच्यासाठी ते आराध्य दैवत आहेत. काँग्रेस सतत हिंदू समाज, हिंदू समाजाचे नेते यांना विरोध करत आलेली आहे. अनेक संकटे आली परंतु आजही हिंदू समाज संरक्षित आहे. याचं कारण हिंदू समाजाचे पराक्रमी, साहसी नेते शिवाजी महाराज हे आहेत. काँग्रेस कधीच त्याला विरोध करू शकत नाही. काँग्रेसच्या नेत्यांना तो पुतळा बसवण्यासाठी अनुमती द्यावीच लागेल, त्यासोबत या देशाच्या जनतेची माफी मागावी लागेल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण? मंगळुरू येथील महावीर सर्कल (पंपवेल सर्कल) येथे मराठा वीर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी मराठा संघटनेच्या मागणीवरून एमसीसीने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मंगळुरू नगरपरिषदेची बैठक झाली तेव्हा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने (एमईएस) कर्नाटकच्या विरोधात काय बोलले याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, एमईएस महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळुरूमध्ये शिवाजीचा पुतळा बसवणे अयोग्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.