ETV Bharat / state

Congress Protest Against Adani Row : कॉंग्रेसची विविध ठिकाणी आंदोलने; अदानींच्या गैरकारभाराची चौकशीची मागणी - आंदोलन

हिंडनबर्गे अहवाल आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस आज देशभर आंदोलन करत आहे. राज्यातही विविध ठिकाणी गौतम अदानींच्या विरोधात कॉंग्रेसच्यावतीने आंदोलने करण्यात आली.

Congress Protest Against Adani Row
कॉंग्रेसची विविध ठिकाणी आंदोलने
author img

By

Published : Feb 6, 2023, 5:13 PM IST

Updated : Feb 6, 2023, 6:50 PM IST

कॉंग्रेसची विविध ठिकाणी आंदोलने

मुंबई : गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानींच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली. त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अदानींच्या गैरव्यवहाराविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आली.

पुण्यात कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन : पुण्यामध्ये आज काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. एलआयसीचे गेट बंद असल्यामुळे हे आंदोलन बाहेरूनच करण्यात आले.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी : पुण्यातील युवक काँग्रेस मात्र एलआयसीच्या विरोधात आक्रमक झाली. पुण्यातील एलआयसी कार्यालयाचे गेट हे सकाळपासूनच बंद होते. युवक कॉंग्रेसच्यावतीने एलआयसीच्या गेटवरती मोठी तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे. आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर आहे, अदानी चोर आहे अशा घोषणा दिल्या.

औरंगाबादेत कॉंग्रेसची निदर्शने : भारतीय स्टेट बँक व भारतीय जीवन बिमा निगम व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने घोषणाबाजी जोरदार करून निर्देशन करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. सामान्य माणसाने आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या कष्टाचा पैसा एलआयसी या अग्रगण्य वित्तीय संस्थांमध्ये गुंतवला. परंतु या नामांकित वित्तीय संस्थेतील कोट्यावधीची गुंतवणूक अदानी समूहास देण्यास सरकारने भाग पाडल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच एलआयसीत गुंतवणूक केलेल्या सामान्य माणसांचा पैसा परत मिळेल का? अशी भीती सध्या निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात कॉंग्रेसच्या प्रमुख मागण्या : औरंगाबादमध्ये कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात अनेक मागण्या केल्या आहेत. अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा चौकशी करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी. तसेच सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखी खाली चौकशी करावी. एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्था मधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकी संदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूकदाराच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे

अकोल्यात ठिय्या आंदोलन : अकोल्यात एसबीआयच्या मुख्य कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत जोरदार नारबाजी केली. या प्रकारामुळे मात्र बँकेत मोठ्या प्रमाणात खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. भारतीय स्टेट बँकेने अदानी कोट्यावधींची कर्ज दिले आहे. या कर्जाच्या माध्यमातून कंपनीने मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. कंपनीच्या अहवालानुसार आदरणीय समूहाच्या सर्वच शेअरची झाली आहे. या संदर्भामध्ये एसबीआय बँक आणि केंद्र सरकार काहीही बोलण्यास तयार नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा : एसबीआय बँकेत ग्राहकांचा सुरक्षित असताना हा पैसा बँकेने अदानी समूहाला देऊ केला. परंतु, या समूहाचे शेअर्सचे खाली पडले असून ग्राहकांच्या पैशाचे नुकसान या बॅंकेने केले आहे. यासंदर्भात बँकेकडून याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेकडून याचे उत्तर मिळणे अपेक्षित नाही, पण आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी दिली.

बँकेत वाढविली सुरक्षा : काँगेसच्या ठिय्या आंदोलनामुळे बँकेमध्ये खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांचा बंदोबस्त बघता ग्राहकांनाही भीती वाटत होती.

यवतमाळमध्ये अदानींविरोधात आंदोलन : अदानी समूहातील आर्थिक गैरकारभार उघड करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी, अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखित चौकशी करावी या मागणीसाठी यवतमाळ येथे स्टेट बँक चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने देऊन आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार मुर्दाबाद मोदी सरकार हाय हाय, अशा घोषणा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलनादरम्यान केल्या. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा : Adani Group Share : अदानी समूहाच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच, मार्केट कॅप निम्म्यावर

Last Updated : Feb 6, 2023, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.