मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपकडून आपले आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसचे सर्व आमदार भोपाळयेथील एका अज्ञातस्थळी रवाना केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारनंतर त्यासाठीच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू करण्यात आल्या आहेत.
आज सायंकाळी काँग्रेसचे आमदार एका खासगी विमानाने भोपाळ अथवा जयपूरला रवाणा होतील, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना विश्वासदर्शक ठरावात संख्याबळ दाखवणे आवश्यक आहे. हा ठराव जिंकण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांसह आणखी काही आमदारांची गरज पडणार आहे. त्यात काँग्रेसचे आमदार गळाला लावण्यासाठी भाजप डावपेच खेळु शकते. त्यामुळे काँग्रेसकडून ही खबरदारी घेतली जाणार आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात लोकशाहीचा खून, तिघे मिळून सरकारचा पराभव करणार'
आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत काँग्रेसचे 42 आमदार उपस्थित होते. तर उर्वरित दोन आमदार गावी असून तेही सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी दिली आहे. यापूर्वीही काँग्रेसने आपले आमदार जयपूर येथे ठेवले होते.