मुंबई - राज्यात एक कोटीहून अधिक बंजारा समाज राहतो. या समाजाची लोक भाषा, वेशभूषा, लोक संस्कृती ही आदिवासी समाजाप्रमाणे आहे. या समाजाचा समावेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये आदिवासींमध्ये होतो. तर कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीमध्ये होतो. तर महाराष्ट्रात विमुक्त जमातीत होतो. यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात केला जावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आज विधान परिषदेत केली.
काय म्हणाले राठोड
राठोड यांनी पुरवण्या मागण्यावरील चर्चेत सहभागी होताना राज्यातील बंजारा समाजाचा समावेश हा आदिवासी प्रवर्गात केला जावा, अशी मागणी केली. बंजारा समाज हा पूर्णपणे आदिवासी सारखा आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये त्यांचा समावेश आदिवासी संवर्गात येतो. त्यामुळे त्या या समाजाचे अनेक प्रश्न असून हे प्रश्न सोडविण्यासाठी या समाजाचा समावेश हा आदिवासी प्रवर्गात करावा, अशी मागणी राठोड यांनी केली. तर भाजपाचे विधान परिषद सदस्य निलय नाईक यांनीही बंजारा समाजातील विविध प्रश्नांवर सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती.
राठोड आणि नाईक या दोन्ही सदस्यांची यांच्या मागणीची दखल घेत बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी बंजारा समाजाच्या पाडे, तांडे यांचा विकास व्हावा, यासाठी त्याचे लवकरच प्रश्न सोडवले जातील आणि त्यासाठीची बैठक घेतली जाईल असे आश्वासन विधान परिषदेत दिले.
हेही वाचा - विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांचा मुंबई महापालिका आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग
हेही वाचा - चेकद्वारे पैसे देण्याचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार, लागू होणार नवीन प्रणाली